Ads

आधारभूत धान खरेदी केंद्राचे पोर्टल त्वरीत सुरू करण्याची शिवसेनेची मागणी .

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुका हा प्रामुख्याने भात पिकासाठी प्रसिद्ध असून या तालुक्यातील बहुतांश खेड्यातील ग्रामस्थांचा व्यवसाय शेती आहे. शेतातील उत्पादनावर खेड्यातील अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शेतातील उत्पादित धान उत्पादनाला उचित दर प्राप्त व्हावा म्हणून शेतकरी उत्पादित केलेला धान महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ, मर्या. मुंबई या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या आधारभूत विक्री केंद्रावर विक्रीसाठी नेतात. शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान विक्रीसाठी आधाारभूत केंद्रावर नेला असता, ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांचे धान विक्रीपासून वंचित आहेत. आधीच आधारभूत धान खरेदी केंद्राना धान खरेदीची मर्यादा ठरवून दिल्याचे संकट शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर उभे असतांना, त्यातच शासनाचे आधारभूत धान खरेदीचे ऑनलाईन पोर्टल बंद झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंता पहावयास मिळत आहे.
शेतकर्‍यांची धान विक्री न झाल्याने मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह, कर्जाची परतफेड, खरीप हंगामासाठी बि-बियाने खरेदी कशी करावी असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. आधारभूत खरेदी केंद्र ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे उत्पादित धानाचे काय करावे असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने आधारभूत केंद्राचे ऑनलाईन पोर्टल त्वरीत सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या नेतृत्त्वात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भूसे, अन्न, नागरी, पुरवठा मंत्री छगन भुजबळ व चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांच्यामार्फत प्रेषित निवेदनातू केली आहे.
यावेळी शामराव भानारकर माजी शहरप्रमुख ब्रम्हपुरी, रमाकांत अरगेलवार ब्रम्हपुरी, दिगांबर आंबोने सोंद्री, धनराज आंबोने, भार्गव टिकले, सरोज कावळे, गोपाल आंबोने, हरिकिसन कमाने, देवाजी मिसार, धर्मा पारधी, श्रीराम आंबोने तसेच पिंपळगाव भो., सोंद्री, लाडज, चिखलगाव येथील शेतकरी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment