Ads

शबाना मोटलानी यांचे मेकअप हेयर स्टाईलवर शेकडो महिलांना अमुल्य मार्गदर्शन .

चंद्रपूर :- हॉटेल सिद्धार्थ प्रिमियम येथे नुकताच शबाना अकादमीच्या सेलीब्रीटी मेकअप आर्टिस्ट शबाना मोटलानी मार्फत मेकअप, हेअर स्टाईलचे भव्य सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. सदर सेमिनार मध्ये चंद्रपूर शहर तथा ग्रामीण भागातून शेकडो युवती व महिलांची उपस्थिती होती. मेकअप हेयर स्टाईल च्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी आहेत आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने महिला व युवतींची या व्यवसायाला चांगली पसंती आहे.Shabana Motlani's invaluable guide to hundreds of women on makeup hairstyles
या क्षेत्रात दरदिवशी नव्या पद्धती शिकत राहणे ही काळाची गरज आहे. परंतु ते नेहमी शिकण्याची हौस असतांना सुद्धा महागळे वर्कशॉप करणे हे सर्वसाधारण महिलांच्या अवाक्या बाहेर असते. म्हणुन शबाना मोटलानी यांनी महिलांच्या उन्नती करीता सर्वसाधारण महिलांना या क्षेत्रात संधीच सोन करता यावे. करीता शहरा शहरात वर्कशॉप घेत असतात. स्वतः ब्राझील, रशिया, चायना, दुबई, लंडन अशा अनेक देशातून मेकअप व हेयर स्टाईलच्या नव्या नव्या पद्धतीचे शिक्षण घेतलेल्या पद्धती इतरांनाही शिकवित आहेत.
सदर सेमीनारचे उद्घाटन श्री. राजेशजी सोलापन, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, तथा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मजर अली अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ, सेमिनारचे आयोजक इरफान खान शबाना मेकअप स्टूडीओ मॅनेजमेंट डायरेक्टर चंद्रपूर होते. या सेमिनामध्ये सुवर्णा दुधे, रुपाली थोरात, रजिया खॉन, अनु तोडे, नयना, मयूरी, दिप्ती सोनटक्के इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment