Ads

सिंदेवाही जवळ स्कार्पिओ व ट्रॅक्टरची समोरासोमोर धडक

सिंदेवाही:- शहरापासून जवळच असलेल्या नागपूर महामार्गावरील मेंढा माल या गावाचे जवळ स्कार्पिओ व ट्रॅक्टर ची धडक झाल्याने अपघात झाला. अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे आहे की नागपूर महामार्गावरील मेंढा माल या गावाचे जवळ दोन वाहनाचे धडक होऊन अपघात झालेला आहे.
ब्रह्मपुरी येथून रुग्णांना सिंदेवाही येथे आणत असताना महिंद्रा स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 34 के 3000 या वाहनाची महिंद्रा ट्रॅक्टर एम एच 34 बी आर 4308 या क्रमांकाचे वाहनाला धडक दिली .दोन वाहनाच्या समोरासोमोर धडक झाल्याने महामार्गाचे रस्त्यावरील कामाचे गट्टू असलेल्या ढिगारा ला जाऊन महिंद्रा स्कॉर्पिओ अडकली होती.ट्रॅक्टर चालक जखमी झाले व इतर किरकोळ जखमी झाली आहेत .नागरिकांचे माहितीनुसार स्कार्पिओ चे वाहन चालक मद्यप्राशन केले होते .सदर अपघातातील धडक झालेले वाहन मेंढा माल येथून जेसीबीच्या सहाय्याने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे . अपघाताचा पुढील तपास पोलिस स्टेशन सिंदेवाही करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment