Ads

०६ जुलै २०२२ पासून सुरू होणा-या आषाढी पंढरपूर यात्रेकरीता चंद्रपूर विभागांमार्फत जादा बसेसची सोय

चंद्रपुर :-दरवर्षी आषाढी यात्रे निमित्त महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूर येथे दर्शनाकरीता जातात मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने पंढरपूर यात्रेवर निर्बंध लागले होते. या वर्षी सदर यात्रा पंढरपूर येथे दिनांक ०६/०७/२२ ते १४/०७/२२ या कालावधीत भरणार असून राज्य शासनाने निर्बंध मुक्त यात्रा व्हावी या करीता प्रयत्न केले आहे.
यात्रेकरीता जाणारे वारकरी दरवर्षी एस.टी. बस सेवेचा लाभ घेउन वारी पूर्ण करीत असल्याने चंद्रपूर जिल्हयातील वारक-यांना जाणे येणे सोयीचे व्हावे या दृष्टीने वारक-यांनी किमान ४० च्या गटाने बसची मागणी केल्यास चंद्रपूर, राजूरा, चिमूर व बरोरा या आगारातून बस पूरविण्याची व्यवस्था रा.प. महामंडळाच्या चंद्रपूर विभागाने केलेली आहे. सदर यात्रेकरीता उपरोक्त प्रमाणे प्रवासी प्रतिसाद मिळाल्यास विभागातून जादा बसेस यात्रेकरीता सोडण्यात येईल. तरी पंढरपूर यात्रेकरीता जाणारे भाविक भक्तांनी चंद्रपूर विभागातील चंद्रपूर आगार - श्री. हेमंत गोवर्धन, बसस्थानक प्रमुख, ७५८८७७३४८३ ०७१७२-२५१७७९, राजूरा आगार - श्री. व्यव्हारे, आगार व्यवस्थापक, ९९७०७०६०२४, ०७१७३-२२२२१६, चिमूर आगार - श्री ईमरान शेख, बसस्थानक प्रमुख, ९२८४८१६४५६, ०७१७३-२६५५४६, वरोरा आगार - श्री दिलीप कोलते, बसस्थानक प्रमुख, ९४०४१६९७९६, ०७१७६-२८२९४८. उपरोक्त अधिकारी / पर्यवेक्षकांची संपर्क साधून जास्तीत जास्त भाविकांनी यात्रेकरीता जाणारे जादा बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती स्मिता सुतवणे, विभाग नियंत्रक, रा.प. चंद्रपूर यांनी केलेले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment