Ads

तत्वज्ञानी महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

ऊर्जानगर (चंद्रपूर):- ज्या मनगटात बळ बुध्दी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो." असा संदेश देणाऱ्या राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३१ मे ला २९७ वी जयंती श्रीगुरुदेव सेवा मंडळ,ऊर्जानगर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे उपकार्यकारी अभियंता महाऔष्णिक वीज केंद्र,चंद्रपूर हे होते.प्रमुख पाहुणे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ढोले व प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ गुरुदेव उपासक अशोक धमाने वर्धा, मुक्ता पोईनकर अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळ,ऊर्जानगर हे होते. यावेळी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंतीचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय सभासद आयुष्यमान मारोती साव यांची मुलगी डॉ.सपना साव यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,ग्रामगीता व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री हेमंत ढोले यांनी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा घेताना तत्कालीन परिस्थितीत एका महिलेने आपल्या कर्तुत्वाने जगा समोर एक आदर्श निर्माण केला.महिलांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष,बलिदान याची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात श्री प्रशांत दुर्गे यांनी जेव्हा वेद काळात निर्माण झाले तेव्हा महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार होते तसेच ते शिक्षण घेवू शकत होते.परंतु कालांतराने पुरुष प्रदान संस्कृती रूढ झाली व पुरुषाने महिलांचे हक्क हिरावून घेतले त्यामुळे मधल्या काळात महिलांची कुचंबणा होत गेली.परंतु आता परत महिला सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत हे शिक्षणाने शक्य झाले असे प्रतिपादन केले.
कुमारी कीर्ती जोगी , कुमारी ऋतुजा कोंडेकर व मुक्ता पोईनकर यांनी अहिल्याबाईचे कार्य, त्यांचा संघर्ष, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमदेव कन्नमवार , प्रास्तविक विलास उगे व आभार हरिश्चंद्र देवतळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने गुरुदेव सेवक,सेविका व बालगोपाल उपस्थित होते.
शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment