Ads

भरधाव येणाऱ्या दुचाकीची सायकलस्वाराला धडक.! एकाचा जागीच मृत्यु तर दुसरा जखमी

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी -आरमोरी मुख्यमहामार्गावर प्रभुकृपा राईस मिल उदापूर जवळ भरधाव येणाऱ्या दुचाकीची सायकल स्वाराला जब्बर धडक दिल्याने An oncoming two-wheeler hits a cyclist! दुचाकीचालकाचा जागीचं मृत्यु झाला तर सायकलस्वार जखमी झालाOne died on the spot and the other was injured असल्याची घटना काहीं वेळापूर्वी घडली आहे.
नितीन राजेंद्र नाकतोडे वय:- २५ असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असून राह.निलज ता. ब्रम्हपुरी जी. चंद्रपूर येथील रहिवाशी आहे.
तर अपघातात श्री.नकटु राऊत वय:६० राह.पारडगाव हे जखमी दुचाकीस्वाराचे नावं आहे.
मृतक दुचाकी चालक नितीन हा ब्रम्हपुरी ला ४:०० ते ५:०० वाजताच्या सुमारास स्वगाव नीलज येथून ब्रम्हपुरीला काहीं महत्वाच्या कामानिमित्त गेला. काम आटपून गावाकडे निघाला असता दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने ब्रम्हपुरी ला जात असलेल्या सायकलस्वार श्री.नकटु राऊत यांना जब्बर धडक दिली त्यामुळे सायकलस्वार श्री.नकटु राऊत हे जखमी झाले.माञ दुचाकी ही भरधाव असल्याने दुचाकी खुप दुर सरपटत गेल्याने दुचाकीचालक नितीनच्या डोक्याला जब्बर मार लागला त्यामुळे नितीन चा जागीच मृत्यु झाला. जखमी सायकलस्वाराला ब्रम्हपुरी येथील रुग्णालय येथे नेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जखमी सायकल स्वार श्री.नकटु राऊत हे कुठल्या रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. हे वृत्त लीहीपर्यंत कळू शकले नाही.
नितीन च्या पच्छात्य कुटुंबात आई,बाबा, पत्नी,मृतक नितीन च एक छोटासा बाळ, भाऊ,वहिनी असा आप्त परीवार आहे.
नितीन हा अगदी प्रेमळ स्वभावाचा व कुटुंबातील लाडका होता. नितीन च्या जाण्याने नाकतोडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीनच्या जाण्याने नाकतोडे कुटुंब व गावापरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभाग करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment