Ads

नवोदय स्पोर्टींग क्लबचा खेळाडू मेहुल ताजने याची स्पोर्ट अथारटी आफ इंडियाच्या साई प्रशिक्षण संस्थेत निवड

भद्रावती ता. प्रतिनिधी :-भद्रावती येथील नवोदय स्पोर्टींग क्लबचा खेळाडू मेहुल दिलीप ताजने याची स्पोर्ट अथारटी आफ इंडियाच्या साई प्रशिक्षण संस्था एच ओ सी इंटरनॅशनल स्कूल पनवेल येथे निवड करण्यात आली आहे.
निवड झालेला मेहुल ताजने हा विदर्भातील एकमेव खेळाडू आहे. या संस्थेत १४ते१६ वयोगटाकरीता खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येते.निवड झालेल्या खेळाडूंना या संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना सिबीएससी पैटर्न मध्ये नि:शुल्क शिक्षण देउन संस्थेमार्फत अथलैटीक व व्हालिबाल चे प्रशिक्षण देउन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविल्या जाते.यादरम्यान निवड झालेल्या खेळाडूंचा प्रशिक्षण तथा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थेतर्फे करण्यात येतो.
मेहुल ताजने याची ही निवड झाल्याबद्दल शहरातील किल्ला वार्ड चे नगरसेवक तथा माजी पालीका उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी,नितीन जगताप,अभिषेक काकडे,प्रणय पतरंगे,अक्षय क्षिरगीरवार तथा नवोदय स्पोर्टींग क्लबच्या सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment