Ads

पाच मोटार सायकल चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने आवळल्या मुसक्या

चंद्रपुर :-काही दिवसापासून चंद्रपूर जिल्हयात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मा.श्री. अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मोटार सायकल चोरी उघडकीस आणण्या बाबत सुचना दिल्या बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखचे अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून गाडी चोरी सबंधाने विशेष मोहिम राबविली.
सदर मोहिमे दरम्यान मोटार सायकल चोराबाबत गुप्त माहिती प्राप्त करून मोटार सायकल चोरी करणारे एकूण 5 आरोपी नामे 1) प्रदीप संजय शेरकूरे वय 24वर्षे रा. पारधी गुडा • धोपटाळा ता. कोरपना जि. चंद्रपूर 2) विजय शंकर देवगडे वय 30 वर्षे रा. पारधीगुडा खैरगांव 3 ) राजेंद्र नानाजी काळे वय 29 वर्षे रा. पारधीगुडा लक्कडाकेट ता. राजूरा जि. चंद्रपूर 4) रोषण अशोक गोबाडे वय 27वर्षे रा. देलनवाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर 5) विपुल प्रभाकर मेश्राम वय 24 वर्षे रा. सायमारा ता. सावली जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून पो.स्टे. वरोरा, पो.स्टे. रामनगर, पो.स्टे. राजूरा, पो.स्टे. गडचांदूर यवतमाळ जिल्हयातील पो.स्टे. वणी येथील गुन्हयातील एकूण 15 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गु. शा. चे स.पो.नि. मंगेश भोयर, पो. उपनि अतुल कावळे, स.फौ. राजेंद्र खनके, पो. हवा. स्वामीदास चालेकर, संजय आतंकुलवार, सुरेंद्र मोहंतो, ना. पो. कॉ. चंद्रकांत नागरे, मिलींद चव्हाण, जमीर पठाण, नितेश महात्मे, अनुप डांगे, संतोष येलपूलवार, गोपाल आतकुलवार, मयुर येरणे, प्रसाद धुलगंडे, प्रमोद कोटनाके, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, कुंदनसिंग बावरी, गोपीनाथ नरोटे, संजय वाढई, दिपक डोंगरे, चालक पो. हवा. प्रमोद डंबारे यांनी केली असुन आरोपी व जप्त मोटार सायकल सबंधीत पो.स्टे. च्या सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सबंधीत पो.स्टे. करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment