Ads

रेतीचा अवैध साठा जप्त - सिंदेवाही तहसील ची कारवाई.

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- तालुक्यातील पेटगाव गावाला लागुन थोडया अंतरावर असलेल्या शेतामध्ये रेती तस्करांनी 20 ब्रास अवैध रेती चा साठा मोठया प्रमाणावर करून ठेवला होता, याबाबत तालुका प्रशासनाने सदर साठा तपासणी करून जप्त केलेला आहे, मात्र सदर साठयातील रेती, रेती तस्कर हे संधीचा फायदा घेवून पेटगाव परिसरात घरकुल व इतर बांधकाम मोठया प्रमाणावर सुरू असुन त्यासाठीच हे रेती तस्कर रेतीचा साठा करून ठेवल्याची चर्चा आहे.Illegal stock of sand confiscated
तालुका प्रशासनाने तालुक्यातील रेती तस्करांवर करडी नजर ठेवून आहेत, अनेकदा कारवाई सुध्दा केलेली आहेत, परंतु तहसीलच्या अधिकाऱ्यांचे नजरचुकवून या परिसरात अवैध रेती वाहतुक केली जात आहे, सदर साठा हा रेती तस्करांकडूनच केला असून ज्या शेतात रेती साठवणुक करण्यात आली, त्यांची कसुन चौकशी केल्यास रेती तस्करांचा नांव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तहसीलदार जगदाळे यांनी म्हटले आहे ही कारवाई सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी मुरकुटे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment