Ads

मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसी भव्य वृक्षारोपन

घुग्घुस :- मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आज दि. ३० जुनला भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सामाजिक उपक्रम पंधरवड्याची सांगता करण्यात आली.
मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम पंधरवडा म्हणून साजरा करु असे प्रतिपादन विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी त्यांच्या वाढदिवशी (दि.११ जुन) ला केले होते. त्यानिमित्त मागील पंधरा दिवसात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजउपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी स्थानिक जनता विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रजातीची शेकडो रोप मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या माध्यमातून पर्यावरणपुरक संदेश देण्यात आला.
यावेळी बोलतांना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात उत्तमरीत्या सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. याच अनुषंगाने आम्ही हा पंधरवडा सामाजिक उपक्रमाने साजरा केला आहे.
याप्रसंगी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, ग्रामगीताचार्य प्रेमालाल पारधी, सुरेश पाईकराव, गुरुदेव सेवा मंडळाचे निळकंठराव नांदे, प्रा. व्ही. टी. पोले, भाऊराव मोहजे, श्रीवास्कर, उसगाव येथील ओबीसी समितीचे अध्यक्ष अरविंद ठाकरे, पडवेकर, योगेश निब्रड, अतुल भोयर, प्रवीण जोगी, विशाल दुर्वेकर, राजू भोंगळे, आशीष मत्ते, झाडे, ताराबाई बोबडे, अंजना कामतकर, शालिनी डोंगे, शकुंतला गायकवाड, गुंफा जोगी, नामदेव मोरे, सुधीर चवरे, राजेश झाडे, जेनेकर, सदानंद बोधाने, रवि देवाळकर, डॉ. आशीष महातळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ओबीसी व विदर्भ विकासाकरिता अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन असेही डॉ. अशोक जीवतोडे या प्रसंगी म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment