Ads

गांधी कुटुंबाला त्रास देणे निंदणीय खासदार बाळू धानोरकर यांचा आरोप

चंद्रपूर :- देशासाठी गांधी कुटुंबाने त्याग केला आहे. बलिदान दिले आहे. त्या कुटुंबाला केंद्र सरकार त्रास देत आहे. हा प्रकार निंदणीय आणि तेवढाच संतापजनक आहे. ईडीच्या माध्यमातून चौकशीच्या नावावर सुरू असलेल्या प्रकाराविरोधात देशभर संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुलजी गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत चालविली जात असलेली कारवाई व केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता शहरातील गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर बोलत होते. आंदोलनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची उपस्थिती होती.
काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत नोटीस देण्यात आली. त्यानंतर राहुलजी गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजरसुद्धा राहिले होते. यानंतर ईडीच्या वतीने सलग तीन दिवस चौकशीला बोलावून जाणिवपूर्वक त्रास देण्यात आला. तसेच दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालण्यात आला. वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करण्यात आली. डांबून ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीचा भाग असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला.
ईडीकडून चौकशीला बोलावून सराईत गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात काँग्रेस पक्ष तीव्र निषेध नोंदवित असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य-ठेमस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती दिनेश चोखारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ओबीसी विभागाचे उमाकांत धांडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धोरणावर तीव्र शब्दात टीका केली.
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत घोषणाबाजी केली. आंदोलनात सर्व माजी नगरसेवक, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, इंटक काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जमाती विभाग, किसान सेल यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनाइजेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment