Ads

घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय आरक्षण दोषपूर्ण ; सैय्यद अनवर

घुग्घूस :- नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग रचना व आरक्षण हे जाहीर झालेले आहे.
घुग्गुस शहर हा प्रामुख्याने दोन भागात विभागला आहे वस्ती तसेच वेकोली वसाहत मात्र आरक्षणात वस्ती भागात पूर्ण पुरुष व कॉलोनी भागात पूर्ण महिला आरक्षण आल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांना निवडणुकी पासून वंचित राहावे लागणार आहे.
वस्ती भागातील सलग असलेल्या 8,9,10,11 या प्रभागात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीलाच आरक्षण दिल्याने सर्वसाधारण प्रवर्गावर अन्याय झाला आहे.
दिनांक 13 जून रोजी नगरपरिषद कार्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण सोडत हे चुकीच्या पद्धतीने काढल्याने ही वेळ आलेली आहे.
आरक्षण हे नागरिकांच्या उपस्थितीत ईश्वर चिट्टीने शालेय विद्यार्थ्यांच्या हस्तेच काढण्यात आले मात्र पद्धत चुकीची होती
आरक्षण काढता वेळी एका डब्यात A - 4 साईज पेपर वर प्रभागाचे नाव टाकून प्रथम निघालेल्या तीन चिठ्ठ्या या महिला साठी राखीव ठेवण्यात आल्या या चिट्टया मोठ्या आकाराचे असल्याने त्या योग्य पद्धतीने एकमेकात मिसळून गेल्या नसल्याने तीन ही चिट्टया सलगपणे अनुसूचित जाती महिला प्रवर्गा करिता राखीव निघाल्याने वस्ती भागात सलगपणे तीन ही प्रभाग हे अनुसूचित जातीच्या पुरुषा करिता गेला यामुळे वस्ती भागातील चार ही प्रभाग हे राखीव झाल्याने सर्वसाधारण गटातील पुरुष निवडणुकी पासून वंचित झाले आहे.
आरक्षण सोडत परत एकदा घेण्यात यावी याकरिता आज 16 जून रोजी कामगार नेते सैय्यद अनवर, सुकुमार गुंडेटी,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,अंकुश सपाटे,नुरूल सिद्दिकी यांच्यावतीने नगरपरिषद कार्यालयात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सदर आरक्षणा विरोधात 21 जून पर्यंत तक्रारी नोंदविता येणार असल्याने नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन सैय्यद अनवर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment