Ads

इको-प्रो तर्फे 'माझा हक्क - शुध्द हवा' अभियान अंतर्गत शहरात वायु प्रदुषणाविषयी जनजागृती

चंद्रपुर :- इको-प्रो तर्फे माझा हक्क् - शुध्द हवा’ उपक्रमा अंतर्गत शहरात नागरीकांच्या जनजागृती सभामधुन शहरातील वायु प्रदुषणाबाबत व नागरीकांच्या सहभागाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमीत्ताने पर्यावरण जनजागृती सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा इको-प्रो चे ‘माझा हक्क - शुध्द हवा’ या पर्यावरणीय अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमीत्ताने इको-प्रो 1 जुन ते 7 जुन या दरम्यान पर्यावरण जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. या दरम्यान सातही दिवस पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे विषयावर वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहे.
आज पर्यावरण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शहरातील वायु प्रदुषण समस्या त्याचे वेगवेगळे स्त्रोत, तसेच औदयोगीक व शहरी भागातील अन्य प्रदुषणविषयी स्त्रोताची माहीती, त्याची कारणे व प्रदुषणाचे नागरीकांच्या आरोग्यावरील परिणाम व उपाययोजना बाबत माहीती देण्यात आली. यात नागरीकांची भुमीका किती महत्वाची आहे याबाबत माहीती देण्यात आली. यावेळी इको-प्रो तर्फे कार्यकर्ते वायु प्रदुषण विषयी जनजागृती माहीतीचे फलक घेउन त्यामाध्यमाने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी नागरीकांना माहीती दिली. तसेच यावरील उपाययोजना करीता शासन-प्रशासनाकडे आग्रही असले पाहीजे, सोबतच आपली नागरीक म्हणुन प्रदुषणात आणखी भर पडणार नाही यासाठी जागृत असावे व आपल्या सभोवतालच्या वृक्षांचे संरक्षण करण्याचे आवाहन यावेळी धोतरे यांनी केले.

या अभियान अंतर्गत औद्योगिक प्रदूषण, शहरातील धुळीचे प्रदूषण, खान परिसरात शेगडी मधे जाळण्यात येणारा कोळसाचे प्रदूषण, टायर व केबल जाळल्याने होणारे प्रदूषण, कचरा, पाला-पाचोळा, प्लास्टिक जाळल्याने होणारे प्रदूषण, वाहनाचे प्रदूषण, यासोबत उपाययोजना म्हणून एयर प्यूरीफायर टावर उभारणे, रोड स्वीपिंग मशीन लावणे, पीयूसी ची गरज, पालिका क्षेत्रात प्रदूषण मापक संयंत्र उभारणे, वृक्षाचे संरक्षण व वृक्षारोपण आदिविषयी या अभियान मधून जनजागृती व आवश्यकता विषयी दिली जात आहे.

रामाळा तलाव लगत योग नुत्य व मॉर्नीग वॉक करणाऱ्या नागरीकांना एकत्रीत करून सदर जनजागृतीपर कार्यक्रमातुन माहीती देण्यात आली. यावेळी इको-प्रो चे नितीन रामटेके, धमेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, सुधीर देव, राजु काहीलकर, भारती शिंदे, सचिन धोतरे व समाजकार्य महाविदयालयाचे विदयार्थी सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment