Ads

*रेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका,

चंद्रपुर :-चंद्रपूर शहर महानगर मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याकरिता मनपा तर्फे जनतेला नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. सदर नोटीसमध्ये दहा दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर २०,०००/-(वीस हजारांची) दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. यावर कुणाचा विरोध नसून प्रशासनाद्वारे जनतेचे मत विचारात घेणे महत्वाचे होते,
परंतू असे न करता हुकुमशाही प्रमाणे दंडात्मक कारवाई करणे हे लोकशाहीची हत्या केल्या सारखे आहे.

चंद्रपूर महानगर 3 झोन मध्ये विभागलेला आहे, यामध्ये झोन क्रमांक 3 मध्ये दलित वस्ती, कामगार वस्ती आहेत ज्यात हातावर आणुन पानावर खाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशा वेळी जवळून 8 ते 10 हजार खर्च करणे परवडणारे नसल्याने जनतेची तक्रार आम आदमी पार्टी कडे येत आहे. आज शहराचे सचिव राजू भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात मनपा ला निवेदनातून विनंती करण्यात आली 5000-/ (पाच हजार रुपये) अनुदान जे रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर देण्यात येणार आहे ते सुरुवातीलाच द्यावे नंतर जे हार्वेस्टिंग करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कोरोना काळ असल्यामुळे मागील दोन वर्षापासून कामधंदे बंद होते घर चालविणे असे झाले होते परिस्थिती अजूनही सुदृढ झाली नाही त्यातच हा रेन हार्वेस्टिंग ची जबरदस्ती त्यामुळे मनपाने तात्काळ नोटिसा पाठवण्याचे बंद करावे अशी मागणी आप तर्फे करण्यात आली.
कोणत्याही गोर गरीब जनतेवर दंडात्मकाची कारवाई आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही. येत्या तिन दिवसांत या नोटीसेस देने बंद केले नाही तर गरीब जनतेला सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळेला आप चे शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला शहर उपाध्यक्ष जास्मिन शेख, बाबूपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप भाऊ तेलतुंडे, वैभव खंडाळे, महीला शहर उपाध्यक्ष सौ. रूपाताई कातकर, महीला शहर सचिव सौ. आरती ताई आगलावे, महीला शहर संघटन मंत्री सौ. सुजाताताई बोदेले, जयदेव देवगडे, कालिदास ओरके, सुखदेव भाऊ दारुंडे, अभिषेक टेंभूर्ने, बाबाराव खडसे, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment