Ads

आष्टी-चंद्रपूर मार्गावर रस्ता सुरक्षा रक्षक तैनात करा

चंद्रपुर :-गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहप्रकल्प खाणीतील कच्चा माल वाहतूक करण्याऱ्या वाहनांना सुरक्षा देण्यासाठी सुरजागड ते एटापल्ली व एटापल्ली ते आलापल्ली या मार्गावरील गावाच्या रस्त्यावर कंपनीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर आष्टी चंद्रपूर मार्गावरील गावात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून तैनात करण्याची मागणी बंडू गौरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याधिकारी यांचेकडे केली आहे.
एटापल्ली ते चंद्रपूर या महामार्गाने सुरजागड लोह प्रकल्पातून रोज दोनशेच्या वर अवजड वाहणे धावत असतात.वाहनांचे अपघात होऊ नये यासाठी सुरजागड, एटापल्ली ते आलपल्ली पर्यंत गावोगावी रस्ता सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून तैनाती केली आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.मात्र आष्टी ते चंद्रपूर या महामार्गावर कोणत्याही गावात रस्ता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नाहीत.परिणामी या मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. लोह प्रकल्पातील लोह खनिज उत्खनन व वाहतुकीचे काम त्रिवेणी मूव्हर्स या कंपनीकडे आहे.कंपनीने सुरजागड,एटापल्ली ते आलापल्ली रस्त्यावरील गावात रस्ता सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत त्याच धर्तीवर आष्टी- चंद्रपूर मार्गावरील सर्व गावात रस्ता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे अशी मागणी भाजप युवा मोर्च्या व चंद्रपूर जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री बंडू गौरकर यांनी जिल्हाधिकारी,चंद्रपूर,जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर,पालक मंत्री ना.विजय वडेट्टीवार,आ.सुधीर मुनगंटीवार,प्रबंधक त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रा.लोमिटेड,सुरजागड व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment