Ads

कर्तव्यदक्ष तलाठी पवार यांना कुर्झा साजात पुर्वव्रत करण्याची मागणी.

ब्रम्हपुरी :-माजी सैनिक असलेले व आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे तालुक्यातील महसूल विभागात नावलौकिक मिळविलेले कुर्झा साजातील पूर्णवेळ तलाठी श्री अमरसिंग पवार यांची कुर्झा साजातुन अवघ्या चार ते पाच महिन्यातील त्यांच्या चमकदार कामगिरी नंतर सुद्धा तालुका महसूल प्रशासनाने तडकातडकी बदली करून कुर्झा साजा क्षेत्राला प्रभारी तलाठी दिल्याने श्री पवार यांची कुर्झा साजात पूर्ववत, पूर्णवेळ तलाठी म्हणून नियुक्ती करण्याच्या मागणी साठी कुर्झा प्रभागातील नगरसेवक, कुर्झा साजातील असंख्य गावकऱ्यांनी तहसीलदार ब्रम्हपुरी यांना तर तसेच पत्रकारांचे शिष्टमंडळांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
कुर्झा साजामध्ये नगरपरिषद ब्रम्हपुरीचा कुर्झा प्रभाग, ग्रामपंचायत नवेगाव, ग्रामपंचायत कोथूळना असा मोठ्या लोकसंख्येचा क्षेत्र येतो तसेच गौण खनिज वाहतुकीचा हा साजा केंद्रस्थान असल्याने याठिकाणी जबाबदार व पूर्णवेळ तलाठी असावा अशी महसूल प्रशासनाची जवाबदारी असायला पाहिजे. मात्र तालुका महसूल प्रशासनाने या साजात प्रभारी तलाठी नियुक्त करीत पूर्णवेळ व कर्तव्यदक्ष असलेले तलाठी श्री पवार यांची केलेली बदली आश्चर्यकारक असून कुर्झा साजाक्षेत्रात कार्यरत असतांना तलाठी श्री पवार यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा आणणे,सामान्य नागरिकांना वेळेत मदत करणे व महत्वाचे म्हणजे आपल्या साजात नेहमीच उपस्थित असणे यामुळे शेतकरी, नागरिकांना श्री पवार आपलेसे करून घेतं मदत करीत आपल्या कर्तव्याचा इमाने इतबारे पालन करीत असत. कर्तव्यदक्षता व विधायक कार्यामुळे तलाठी पवार आपल्या साजात पूर्वव्रत रुजू व्हावेत असे साजातील नागरिकांना वाटणे साहजिकचं आहे.

आपल्या कर्तव्यदक्षतेची ओळख देतं श्री पवार यांनी अवैध वाळू तस्करांवर वेळोवेळी आळा घालत विना परवाना वाळूची वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही दबावात न येता जमा केलेत याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रसारित झाल्यात. मात्र अवैध वाळू तस्करी मध्ये गुंतलेले तस्कर, तस्करी मधील सेटिंग मास्टर, तस्करांसह संबंधित काही राजकीय व्यक्ती तसेच महसूल विभागातील काही लोकांच्या डोळ्यांमध्ये तलाठी श्री पवार खुपायला लागले व त्यांच्या आर्थिक हित संबंधात अडथळा निर्माण झाल्याने रस्त्याचा काटा असल्याचे त्यांना वाटू लागले. त्यामुळे तलाठी यांचेवर कुरघोडी करत श्री पवार यांची कुर्झा साजातून उचलबांगडी करून तहसील कार्यालयामध्ये बाबूगिरी करण्याकरिता तलाठी कार्यामधून पदमुक्त केले अशी सर्वत्र लोकचर्चा आजघडीला तालुक्यात चर्चिली जातं आहे.

नगरसेवक श्री सागर आमले, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ न्यूजच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ तसेच नगरपरिषद ब्रम्हपुरीतील कुर्झा प्रभाग, ग्रामपंचायत कोथुळना, ग्रामपंचायत नवेगाव येथील अंदाजे पाचशे सह्यानिशी साजातील नागरिकांच्या वतीने श्री अमरसिंग पवार यांना कुर्झा साजा क्र ०६ येथे पूर्णवेळ तलाठी म्हणून पूर्वव्रत नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार मा. उषा चौधरी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनाच्या प्रतिलिपी मा. पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर , विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. त्यामुळे तहसीलदार काय निर्णय घेतात या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment