Ads

इको-प्रो ने केलेल्या शहरातील गोंड़कालीन किल्ला-परकोट स्वच्छता व पर्यटन कार्याची खासदार सुप्रियाताई सुळे केली पाहणी .

चंद्रपूर:- बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी आज सहा जून रोजी सायंकाळच्या सुमारास रामाळा तलाव येथील इको-प्रो संस्थेच्या कार्यालयात भेट दिली. त्यांनी चंद्रपुरातील गोंडकालीन परकोट किल्ल्याची पाहणी करीत संस्थेने केलेल्या स्वच्छता कार्याची व सुरु असलेल्या हेरिटेज वॉक पर्यटनाची पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेचे कार्य व माहिती जाणून घेतली. यावेळी ऐतिहासिक रामाला तलाव संवर्धनाचे प्रयत्न व शहरी तलाव संवर्धन मोहिमेची माहिती देत नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा संवर्धन करिता "आपला वारसा, आपणच जपुया" मोहिमेचे व सध्या सुरु असलेल्या 'माझा हक्क - शुद्ध हवा' अभियांनाचे सुरु असलेले कार्य व याचे महत्व समजावुन सांगितले.
जिल्ह्यात मागील सतरा-अठरा वर्षांपासून इको-प्रो संस्था पर्यावरण रक्षण, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वास्तू संवर्धन आपत्कालीन व्यवस्थापन, रक्तदान, आरोग्य या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. आता नव्याने महिला सक्षमिकरण, बेरोजगार युवकांना उद्योग करण्यास आणि प्रेरित करण्यास लघु व गृह उद्योग क्षेत्रांमध्ये देखील एक उपक्रम संस्थेने पाऊल टाकले असून 'गावठी हेल्थ स्टोअर' सुरू केले आहे. त्यास देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. इको-प्रो संस्थेच्या कार्याचे, अविरत परिश्रम घेणारे सदस्य आणि कार्यकर्त्याचे अनुशाशन विषयी विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि नितिन भटारकर यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे नितिन रामटेके, संजय सब्बनवार, अनिल अडगुरवार, मनीष गावंडे,अब्दुल जावेद सह अनेक महिला-युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment