Ads

मोदी सरकार तरुणांना अग्नीवीर नाही संकटवीर बनविणार : खासदार बाळू धानोरकर.

चंद्रपूर : भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. अशा शब्दात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी 'अग्निपथ' योजनेवरून टीकास्त्र सोडले.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात आज काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर चौकात धरणे आंदोलन देण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलतांना खा.धानोरकर म्हणाले, देशात वाढत्या बेरोजगारीमुळे तरूणांमधे मोठ्या प्रमाणात असंतोष असतांना आता तरुणांच्या देशसेवेच्या व्रताला काळिमा फासण्याचे काम आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. चार वर्षात देशातील तरुणांना हे सरकार अग्नीवर नाही तर सकटवीर बनविणार असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी केली. Modi government will make youth not heroes but crisis heroes: MP Balu Dhanorkar
आज वरोरा येथे खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार अविनाश वारजूरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे,सुनंदा जिवतोडे, छोटु शेख, मनोहर स्वामी, राजू महाजन प्रदीप बुराण, माजी सभापती रवींद्र धोपटे, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, अनील झोटींग, शुभम चिमुरकर, रत्नाताई अहिरकर, यशोदा खामनकर, ईस्तेखां पठाण,रामदास सुर, निखील राऊत, सुयोग धानोरकर, राहील पटेल, प्रमोद नागोसे, विजय पुरी, तन्नु शेख, रीयाज अनवर, सलीम पटेल, सुभाष दांदले, नगरसेविका प्रतिभा निमकर, धम्मकण्या भालेराव, संजय घागी, सुजीत कष्टी, अरूण बरडे,बसंत सिंग, चेतना शेट्ये, मिना रहाटे, आसीफ रजा, पंकज नाशिककर, सन्नी गुप्ता, अयुब पठाण, शिरोमणी स्वामी, मंगला पिंपळकर, उज्वला थेरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेडकर चौकातुन काँग्रेसचे पदाधिकारी घोषणा देत उपविभागीय अधीकारी कार्यालयात धडकले. आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधीकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धरणे आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment