Ads

ब्रम्हपुरी नगरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ब्रम्हपुरी :-  भारतीय योगविद्येच्या प्राचीन परंपरेला संपूर्ण विश्वात आज मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योग हा मानवी  जीवनशैलीचा अविभाज्य अंग व्हावा याच हेतूने परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेव बाबा मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. भारताने देखिल जागतिक स्तरावर योग प्राणायमाचे महत्व जगाला पटवून दिले.त्याचीच प्रचिती म्हणून सन २०१५ पासून दरवर्षी २१ जून हा आतंरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातोय. याच धर्तीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल ब्रम्हपुरी येथे नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिनानिमित्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
          पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान , युवा भारत , महिला पतंजली योग समिती, पतंजली किसान सेवा समिती ब्रम्हपुरी , नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय एन.सी.सी.तथा एन.एस.एस.विभाग व नगर परिषद ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री एन.एस.कोकोडे सर यांनी योग प्राणायमाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख अतिथी नगराध्यक्षा सौ.रिताताई उराडे यांनी योग प्राणायमाद्वारे सर्वांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे आवाहन याप्रसंगी केले. प्रमुख अतिथी   प्रा.अतुल देशकर यांनी तरूणांनी योगसाधनेतून बलोपासना करून व्यसनमुक्त होण्याबाबत मार्गदर्शन केले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. डि.एच.गहाणे , डाॅ. एस.एम. शेकोकर , डाॅ. प्रकाश वट्टी, प्राचार्य रणदिवे सर , सेवानिवृत्त प्रा. जयंतराव खरवडे, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती भगवान पालकर , दिनकरराव हजारे उपस्थित होते.
       दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान कन्नाके तालुका प्रभारी भारत स्वाभिमान यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.कुलजीत कौर गिल मॅडम तथा प्रा.अभिजीत परकरवार यांनी केले.आयुष मंत्रालय तथा पतंजली योगपीठ हरिद्वार च्या प्रोटोकाल नुसार योगप्राणायमाचे प्रात्याक्षिक जिल्हा प्रभारी भगवान पालकर यांनी करवून घेतले. प्रात्याक्षिक सादरीकरण नरेश ठक्कर तालुका प्रभारी पतंजली योग समिती ब्रम्हपुरी, रूद्राक्ष राऊत , सावी उरकुडे,श्री तोंडरे , भगवान कन्नाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत तलमले किसान सेवा प्रभारी, दिलिप जुमडे महामंत्री , डाॅ. नरेश बावनकुळे चिकित्सक प्रभारी , सुभाष माहोरे मिडिया प्रभारी, योगसाधक तेजराम येरणे , महेश येरणे, रामकृष्ण थोटे, मधुकर खेत्रे , हरिराम सेलोकर , दिलिप कामते इत्यादी सर्वानी मोलाचे सहकार्य केले. तालुका व शहरातील योग केंद्रातील साधक मंडळी , गुरूदेव सेवा मंडळ अड्याळचे गुरूदेवप्रेमी , रा.स्व.संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक  अनेक सामाजिक , आध्यात्मिक क्षेत्रातील योगप्रेमी मंडळी यानिमित्ताने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन नरेश ठक्कर यांनी केले.वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment