Ads

भद्रावती तालुका ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाला सुरुवात.

भद्रावती ता.प्रति :-थकित विज बिल न भरल्यामुळे भद्रावती तालुक्यातील ६५ग्राम पंचायतीचा विज पुरवठा विज वितरण कंपणीकडून कापण्यात आला.हे विज बिल शासनाने भरेपर्यंत या सर्व ग्रामपंचायतीं चा विद्युत पुरवठा सुरु करण्यात यावा यासाठी भद्रावती ग्राम संवाद सरपंच संघटनेने विज वितरण कंपणीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयाकडे निवेदन दिल्यानंतर या निवेदनाची दखल विज वितरण कंपणीकडून घेण्यात न आल्याने भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय विज कार्यालयासमोर सदर सरपंच संघटनेने दि.९रोज गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुधाकर रोहणकर,नयन जांभुळे,शंकर रासेकर,शरद खामनकर,मोहित लभाने,मनिषाताई रोडे,भावनाताई कुरेकार,सुचिता ताजने,मयुर टोंगे,वंदना दातारकर,मनिषा तुराणकर,विद्या सावसाकडे,एकनाथ घागी,स्वप्नील पानतावने,अनील खडके,शामराव नन्नावरे,रेखा पोईनकर,विजय खंगाल,भाग्यश्री येरगुडे हे१९ सरपंच बेमुदत उपोषणाला बसले आहे.जोपर्यंत या सर्व ग्रामपंचायतींचा विज पुरवठा सुरु केल्या जात नाही तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचे सरपंच सुधाकर रोहणकर यांनी सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment