Ads

बाळासाहेबांचे जे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुखानी पूर्ण केले नाही,ते भाजपने आज पूर्ण करुन दाखविले आहे.

एका सामान्य वृत्तपञ विक्रेत्याला राष्ट्रपती व एका सामान्य चहावाल्याला प्रधानमंञी आणि आज एका सामान्य रिक्षाचालकाला मुख्यमंञी बनविण्याचे काम भाजपनेच केले

भाजपा युवानेते महेश कोलावारांचे पक्षाबद्दल गौरवोद्गार
चंद्रपूर :- बाळासाहेबांचे जे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुखानी पूर्ण केले नाही,ते भाजपने आज पूर्ण करवून दाखविले आहे असे वक्तव्य भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी केले आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले,मागील ११ ते १२ दिवसांपासून महाराष्ट्रात जे राजकीय वर्तुळ सुरु होते,अखेर त्या राजकीय वर्तुळाला आज विराम मिळाला आहे.हिंदुत्व,दुय्यम वागणूक व इतर कारणांमुळे शिंदे गटाच्या शिवसेना आमदारांनी ११ ते १२ दिवसा अगोदर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा सोडून गुवाहाटीला रवाना झाले.

११ दिवसाच्या राजकीय वर्तुळाच्या उपरांत काल मविआचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंञी व आमदारकीचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्याच्या एक दिवसानंतर म्हणजेच आज सकाळी एकनाथ शिंदे व भाजप यांच्या विस्तृत चर्चेनंतर शिंदे गटाला भाजपनी पाठिंबा देऊन बहुमत सिद्ध करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंञी बनविण्याचे निर्णय घेतले.

खरं तर दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंञी व एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी अशी चर्चा सुरु असतांनाच एकनाथ शिंदे व भाजप यांच्यात झालेल्या चर्चेनंतर माञ नवीन निर्णय राज्यासमोर आलेला आहे. या निर्णयामुळे राज्याला माञ एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. भाजपनी घेतलेल्या निर्णयाचे पक्षात व सर्वञ स्वागत होत आहे असे मी मानतो.या अगोदरही भाजपने असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे.

यापूर्वी एक सामान्य वृत्तपञ विक्रेता म्हणून काम केलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती (एपीजे अब्दुल कलाम) (APJ Abdul Kalam)व एक सामान्य चहावाला म्हणून रेल्वे स्टेशनवर चहा विकण्याचे काम केलेल्या व्यक्तीला प्रधानमंञी (नरेंद्र मोदी)(Narendra Modiआणि आज एक सामान्य रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या व्यक्तीला मुख्यमंञी (एकनाथ शिंदे)(Eknath Shinde)बनविण्याचे काम भाजपनेच केले आहे.ही ताकद व निर्णयक्षमता भारतीय जनता पक्षात आहे व त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते असल्याचा आनंद होतो असे
गौरवोद्गार महेश कोलावारांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment