Ads

जागतिक सायकल दिनी इको-प्रो व नेहरू युवा केंद्र कडून सायकल रैली .

चंद्रपुर :-आज जागतिक सायकल दिन निमित्त चंद्रपूर शहरात इको-प्रो संस्था व नेहरू युवा केन्द्र च्या वतीने सायकल रैली चे आयोजन करण्यात आले होते.
इको-प्रो संस्थेचे 'पर्यावरण जनजागृती सप्ताह' 1 जून ते 7 जून सुरु आहे. आज जागतिक सायकल दिन निमित्ताने इको-प्रो, नेहरू युवा केन्द्र व एस आर एम समाजकार्य महाविद्यालय चे विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. आज सकाळी रामाळा तलाव येथून जनजागृती सायकल रैली चे आयोजन करण्यात आले. यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार, नितिन रामटेके, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख, प्रगती मार्कण्डवार, नेहरू युवा केन्द्र उपस्थित होते, यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सायकल रैली रामाला तलाव, जटपुरा गेट, गांधी चौक मार्गे परत जटपुरा गेट व समारोप रामाला तलाव येथे करण्यात आला.

चंद्रपूर शहर सर्वाधिक प्रदूषित असल्याने विविध विभाग कडून प्रदूषण नियंत्रण उपाययोजना सोबत नागरिकांनी सुद्धा प्रदूषण नियंत्रण करिता प्रयत्न करणे, सायकल चा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. तसेच या प्रदूषण पासून सुरक्षित राहन्यास आपले आरोग्य निरोगी राखन्यास सायकल चालवीणे गरजेचे असून आपले पर्यावरण व आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी व्यापक चळवळ उभारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बंडू धोतरे यांनी केले. यावेळी नितिन रामटेके, प्रगति मार्कण्डवार यांनी आपले मत मांडले.

सायकल रैली मधे इको-प्रो चे धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, राजू काहीलकर, अनिल अडगुरवार, चित्राक्ष धोतरे, नेहरू युवा केन्द्र जयश्री चव्हाण,प्रगती चूनारकर,कुणाल वंजारी, नेहा मार्कंडवार, ऋतुजा वानखेडे,प्रगती मार्कंडवार,प्रणय मेश्राम, वेदांत घटे ळ, प्रिया उईके समाजकार्य महाविद्यालय चे पूनम रामटेके, प्रतीक्षा मातेरे, विभा सूर्यवंशी, पल्लवी तूपसुंदर, लक्ष्मी मेश्राम, प्रियंका भोयर, प्रतीक्षा देऊलकर, प्रतिभा चौधरी, प्राजक्ता दुयोधन, विशाल पवार, सोनम कुमरे, अंकित बलकी, अमित राऊत, तसेच
मंजिरी. पुरंदरे, रेहान गर्गेलवर, आर्या ठाकरे, स्पृहा देव सहभागी होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment