Ads

भद्रावतीत सर्व सलुन व पाॅर्लस दुकाने बंदला उस्फुर्त प्रतिसाद

भद्रावती :- मागील दोन वर्षे कोरोना लाॅकडाऊनमुळे नाभिक सलुन दुकान व्यवसायकांचे दुकाने बंद ठेवण्यात आल्याने नाभिक सलुन पाॅर्लस आर्थिक संकटात सापडला होता. या कारणामुळे भद्रावती नाभिक सलुन असोसिएशनने सलुन व्यवसायकांचे आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी काही दिवसासाठि दर सोमवार ला सलुन दुकाने चालू ठेवण्यात आले होते. जुन्या कार्यकारणीचा कार्यकाल संपल्याने सलुन असोसिएशनचे मावळते अध्यक्ष रवींद्र शेंडे यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक श्री. संत नगाजी महाराज देवस्थान येथे दि. ६/६/२०२२ रोज सोमवार ला सायंकाळी ठिक ६-०० वाजता सभा घेऊन नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.
नवीन कार्यकारणी
याप्रमाणे अध्यक्ष- पांडुरंग हणुमंते, उपाध्यक्ष- बंडु एम लांडगे,सचीव- बंडु व्ही लांडगे,सहसचीव- सागर घुमे, कार्याध्यक्ष- सचिन नक्षिणे, कोषाध्यक्ष- शंकर हणुमंते, सदस्य- अंकुश दर्वे, सचिन मांडवकर, आशिष चौधरी,शंकर वाटेकर, व प्रशांत नागमोते यांची निवड करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीमध्ये दर सोमवारला सलुन व पाॅर्लस दुकाने बंद ठेवणे व प्रत्येक दुकानामध्ये ठरलेल्या रेट बोर्ड प्रमाणेच दर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नियम न पाडल्यास असोसिएशने ठरविले प्रमाणे सलुन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.या अनुषंगाने
आज दि. १३/६ २०२२ ला पहिला सोमवार असल्याने पाहण्यासाठी असोशिएशनचे नवीन पद कार्यकर्ते व सलुन चालकांनी नाग मंदिर ते पेट्रोल पंप रॅली काढण्यात आली.
या रॉलीमध्ये सुधीर लांडगे,सेनापती दैवलकर,राजेश येसेकर, बंडु व्ही लांडगे,पांडरंग हणमंते,अंकुश दर्वे,सचिन नक्षिणे ओशंकर वाटेकर,अशोक चौधरी, सतिश मांडवकर, जग्गू चौधरी, प्रशांत नक्षिणे, चंदु तंगडपल्लीवार व राजु वाटेकर,यांनी सहभाग घेतला होता .या रॅलीमध्ये सर्व सलुन चालकांने सहभागी होऊन आपले दुकाने बंद ठेवुन उत्कु प्रतीसाद दिल्याचे समाधान व्यक्त करुन हुतात्मा स्मारक भद्रावती येथे सभा घेऊन नवीनच पदाधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment