Ads

आयुष भारत ने विविध राज्यांमध्ये केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी :-जागतिक योग दिन देशात उत्साहात साजरा झाला. शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी योगासनांचा प्रचार व प्रसार आयुष भारत संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांनीही केले योगासने करत सुदृढ आरोग्य राखण्याचा निश्चय केला.AYUSH Bharat has done Yogasadhana in various states; Celebrate International Yoga Day with enthusiasm
आयुष भारत तर्फे योग दिन देशात उत्साहात साजरा करण्यात आला आयुष भारत संस्थापक अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व योग शिक्षिक डॉ.शाहिन मुलाणी यांनी सूर्यनमस्कार व प्राणायाम यांची माहिती देत उपस्थितांकडून त्याचा सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय योगा समुपदेशक डॉ.जलील शेख यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगासनांचे फायदे सांगितले. आयुष भारत राष्ट्रीय सचिव डॉ.किशोर बोकील यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. आयुष भारत तर्फे डॉ.गायत्री हजारे यांना ‘योग आचार्य’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. डॉ.किशोर बोकील यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमांमध्ये आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, डॉ.शाहिन मुलाणी, डॉ.गायत्री हजारे, डॉ.सुहास शेवाळे, डॉ.रसुल पठाण (पुस), डॉ.काशिनाथ माळी, डॉ.राजे मॅडम, डॉ.सिता भिडे, डॉ.शब्बीर पठाण, डॉ.फिरोज पठाण, डॉ.नवले सर सातारा व आदी मान्यवर उपस्थित होते. आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी योगनिकेतनच्या योग शिक्षकांना आमंत्रित केले होते. डॉ.राजे मॅडम त्यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार करण्यात आले.
आयुष भारत यांच्यातर्फे देशातील विविध राज्यांमध्ये योगासनांचे कार्यक्रम घेण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment