Ads

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर संविधान भवनाचा प्रस्ताव समाजिक न्याय विभागाकडे सादर

चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर संविधान भवन संदर्भातील जागेचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता चंद्रपूर येथील संविधान भवनाच्या निर्मितीसाठी लवकरच निधीची तरदुत करण्यात येणार आहे.
जगाला अभिमान वाटेल असे भारतीय संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केले. याचा अभ्यास करण्यासाठी विदेशी नागरिक भारतात येत असतात. त्यामुळे आपल्या संविधान बाबत भारतीयांनाही अचूक माहिती असने गरजेचे आहे. संविधान निर्मितीचा प्रवास, त्यातील न्याय व्यवस्था, अधिकार या सर्वांची युवा पिढीला अधिक माहिती कळावी या करिता चंद्रपूरात संविधान भवन निर्मिती करण्यात यावी या भवनात सदर सर्व बाबींचा समावेश असावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीसाठी मुंबई स्तरावर संबंधित विभागाशी त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या मागणीची सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दखल घेण्यात आली आहे.

सदर भवनाच्या निर्मितीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांना केली होती. त्यानंतर संविधान भवन निर्मितीकरिता जागा निश्चित करुन तसा प्रस्ताव सामाजिक न्यायविभागाकडे पाठविण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले होते. निर्देश प्राप्त होताच महसुल विभागाने जागा निश्चित करुन तसा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठविला आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेली मागणी पुर्ण होणार असुन त्यासाठी मुंबई स्तरावर वेगवाण हालचालीही सुरु झाल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने याचा पाठपुरावाही सातत्याने सुरु ठेवण्यात आला आहे.

घुग्गुस येथे इनडोअर-आउटडोअर स्टेडियम साठी जागा उपलब्धतेचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर घुग्घुस येथे इनडोअर-आउटडोअर स्टेडियम उभारण्याबाबचा प्रस्ताव महसूल विभागाकडे घुग्घुस नगर परिषदेच्या वतीने सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता येथे लवकरच सर्व सोयी सुविधायुक्त इनडोअर-आउटडोअर स्टेडियम तयार होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्यगिक नगरी म्हणून घुग्गुस हे शहर प्रचलित आहे. सद्या या ग्राम पंचायत घुग्गुस चे रुपांतर घुग्गुस नगर परिषद मध्ये करण्यात आलेले आहे. ह्या शहरात दाट लोकवस्ती असून विविध कारखाने आणि उद्योग अंतर्गत कामगार व अधिकारी वर्ग वास्तव्यास आहे. मात्र या परिसरातील प्रदूषणामुळे नागरिकांवर अनेक जीवघेणे आजार आणि शरीरावर विपरीत परिणाम पडत आहे. त्यांना आपले आरोग्याचे जतन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरिता कसरत, क्रीडा, मैदानी खेळ आणि व्यायामाची आवश्यकता आहे. त्याकरिता शहरामध्ये क्रीडांगण नसल्यामुळे येथील नागरिकांना अडचण येत आहे. त्यामुळे नवनिर्मित नगरपरिषद घुग्गुस येथे सुसज्ज तालुकास्तरीय इनडोअर-आऊटडोअर क्रीडा संकुल उभारण्याकरिता शहरालगतच महसूल विभागाची मोकळी, प्रशस्त व मुख्य रस्त्यालगत जागा आहे. भव्य क्रीडांगण उभारण्याकरिता उपयुक्त अश्या या जागेमधून किमान १० हेक्टर आर. जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही जागा सदर क्रिंडागणा करिता उलब्ध करुन देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली होती. याची दखल घेत तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसुल विभागाने घुग्घुस नगर परिषदेला दिले होते. आता या जागेचा प्रस्ताव घुग्घुस नगर परिषदेने महसुल विभागाकडे सादर केला आहे. त्यांनतर क्रिडा व युवक कल्यान मंत्री यांनी सदर क्रिडांगणासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment