Ads

६५ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याचे कार्यकारी अभियंता यांना इशारा

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- भद्रावती तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतच्या पथदिव्याचा वीजपुरवठा २ तारखेला एकाच वेळेस महावितरण कंपनी कडून खंडित केल्याने गेल्या सात दिवसापासून ग्रामीण भाग अंधारात असल्याने आज ६५ ही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता सचिन घडोले यांना निवेदन देऊन दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा ९ जून पासून गावकऱ्यांना घेऊन महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करू असा निवेदना द्वारे इशारा दिला आहे.
शासनाच्या घेतलेल्या निर्णयामुळे महावितरण कंपनी कडून ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा या आधी सुद्धा कापण्यात आला होता तेव्हा सर्व ग्रामपंचायतिने एकवटुन लढा दिला होता व त्याबाबत तक्रार दिल्या होत्या तक्रारीनंतर शासनाने माहे २०२२ मध्ये रु.२.०६ कोटी महावितरण कंपनीला सार्वजनिक दिवाबत्ती बिलापोटी देण्यात आले होते.तसाच निर्णय सरकार घेईपर्यंत महावितरण कंपनीने कापलेली लाईन पूर्ववत सुरु करावी असे निवेदन भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर व ग्राम संवाद सरपंच संघटनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष नयन जांभुळे यांच्या शिस्ट मंडळाने कार्यकारी अभियंता सचिन घटोळे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की हि वेळ पाउस सुरु होण्याची असून ग्रामीण भागातील शेतकरी शेतात कामावर जाऊन घरी येताना गावात अंधार जर असेल तर त्या अंधारात पावसामुळे निघणारे जीव जंतू व हिस्त्र वन्यप्राण्यामुळे कोणाची जीवित हानी झाली तर यास सर्वशी महावितरण कंपनीची जबाबदार असेल. म्हणून आपण खंडित केलेला वीज पुरवठा २ दिवसात पूर्ववत सुरु करावा, अन्यता भद्रावती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे भव्य आंदोलन केल्या जाऊन तेथेच महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर उपोषण केल्या जाईल याची आपण दखल घेऊन वीज पूरवठा सुरळीत करावा असे निवेदन दिले.निवेदन देते वेळेस सुधाकर रोहनकर सह ग्राम संवाद सरपंच संघटना भद्रावतीचे तालुका अध्यक्ष नयन जांभुळे,महिला अध्यक्ष मनिषा गनेश रोडे ,कार्य. अध्यक्ष शंकर रासेकर, प्रदिप महाकुलकर,उपाध्यक्ष शरद खामनकर ,भावना कुरेकार, विजय खंगार भाग्यश्री येरगुडे, सचिव पौर्णिमा ढोक, मोहित लभाने,एकनाथ पागी,मयुर टोंगे, धनराज पायधन, मंगेश भोयर,संगीता देहारकर,पूजा उईके,रवींद्र पाटील,खुशाल रोडे,महेश मोरे,प्रवीण बांदूरकर,विठ्ठल येरेकार,सुनील खामनकर,मोहित लभाने,भीमराव संगोळे,गीता मानगुडधे,बंडू ननावरे, विदया सावसाकडे, रमाकांत सावसाकडे,वैशाली जीवतोडे,दिलीप सावसाकडे,मंगेश रोडे,धनराज पायधन,नागोजी कामटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सुधाकर रोहनकर
सरपंच भटाळी

गेल्या सात दिवसापासून भद्रावती तालुक्यातील ७० ग्रामपंचायत मधील पथदिवे बंद आहे त्यामुळे ग्रामीण जनतेला फार त्रास होतो आहे.कार्यकारी अभियंता वरोरा यांना आज निवेदन देऊन दोन दिवसात आमचा वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली आहे अन्यथा आम्ही दोन दिवसानंतर कार्यालयासमोर आंदोलन करू.
नयन बाबाराव जांभुळे
तालुका अध्यक्ष
ग्राम संवाद सरपंच संघटना, भद्रावती
भारत कृषी प्रधान देश आहे व ग्रामीण क्षेत्रात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. गेल्या सात दिवसापासून खेड्यातील पथदिवे बंद असल्याने शेतकऱ्यांना जंगली पशुचा जास्त धोका आहे.त्यातही आमचा भाग जंगलाने व्याप्त आहे.कोण्याही ग्रामीण क्षेत्रातील व्यक्तीच्या जीवास कमी जास्त झाल्यास याला महावितरण कंपनी जवाबदार राहील जर दोन दिवसात पथ दिव्याचा वीजपुरवठा सुरू न केल्यास तालुक्यातील ग्रामस्थांना घेऊन कार्यालयासमोर आंदोलन करू.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment