Ads

1 लाखाची लाच घेताना वनपालाला रंगेहात अटक

चंद्रपूर / पाथरी :- सागवान लाकडाच्या वाहतुकीकरिता लागणारा ठेकेदाराचा निर्गत परवाना म्हणजे TP देण्यासाठी वनपालाने तक्रारदाराला 1 लाख 2 हजारांची लाच मागितली, forest ranger तडजोडीअंती 1 लाख रुपये देण्याचे ठरले, वनपाल यांना घरी पैसे स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे सिंदेवाही तालुक्यातील मौजा गुंजेवाही येथे राहतात, गावातील शेतकऱ्याच्या शेतात कटिंग केलेले सागवान लाकूड वाहतूक करण्यासाठी TP ची गरज असल्याने उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांचेकडे अर्ज केला, मात्र कोडापे यांनी तक्रारदाराला TP देण्यासाठी 1 लाख 2 हजार रुपये द्यावे लागेल, असे म्हणत सरळ त्यांना लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1 लाख रुपये देण्याचे ठरले. Corruption and bribery पैसे देण्याची तक्रारदाराला इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधला व त्यांना तक्रार दिली. Bribe प्रकरणाची पडताळणी केल्यावर लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी 3 जून ला स्टाफ सह सापळा रचला. तक्रारदाराला वनपाल कोडापे यांनी पैसे घेऊन घरी बोलावले, शासकीय निवासस्थानी वनपाल 1 लाख रुपये स्वतः स्वीकारत असताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने कोडापे यांना रंगेहात अटक केली. पुढील तपास सुरू आहे. anti corruption department trap

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment