Ads

शहरात भरदिवसा वाळू तस्करीतील दोन ट्रॅक्टर जप्त

ब्रम्हपुरी :- विनापरवानगी अवैध वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरने वाहतूक करीत असतांना MH 33-1276 या क्रमांकाचा ट्रॅक्टर विद्यानगर ब्रम्हपुरी परिसरात भर दिवसा बुधवारला 10 वाजता पकडला गेला . Two tractors seized during  sand smuggling in the city तपासणी अंती वाहन चालकाकडे कुठलाही परवाना ( रॉयल्टी ) नसल्याचे निष्पन्न झाले .
मात्र काहींचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दबाव येत असतांना तलाठी यांनी कुठल्याही दबावाला न जुमानता आपले कर्तव्य निभावत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ब्रम्हपुरी येथील सुपर एन्ट्रीचा सेटिंग मास्टर म्हणून ओळखला जाणारा वृद्ध (माजी कोतवाल) दबाव टाकत ट्रॅक्टर सोडण्यास बोलत असता अचानक एका वृत्तपत्राचा प्रतिनीधी तिथे आल्याने सेटिंग मास्टर ला मात्र पळता भुमी कमी झाल्याचे उपस्थितीतांना बघायला मिळाले व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करून तलाठी पवार यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय करून दिला . तर याच दरम्यान उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी एन . एच . कॉलेज परिसरात बोंडेगाव येथे अश्याच प्रकारे विना परवाना वाळूची वाहतूक करीत असलेला विना नंबरचा असलेले ट्रॅक्टर पकडुन तहसील कार्यालयात जमा करून आपले कर्तव्य बजावले .

ब्रम्हपुरी तालुक्यात अशा घटना नवीन नसुन राजरोसपणे दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर, ट्रॅक हायवा,टिप्पर ने सुपर एन्ट्री च्या नावाने अवैध वाळू वाहतूक केली जात असून तस्कारावर मात्र कार्यवाही करण्यात येत नसल्यानें आजची अवैध वाळू तस्करांवरील केलेली कार्यवाही कोटा रेट असल्याची लोक चर्चा सूरू आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment