Ads

नेत्ररुग्णांची बारावी तुकडी सेवाग्राम येथे रवाना .

चंद्रपुर :-आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा मुलगा चि. शौर्य बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार ७ मे रोजी घुग्घुस परिसरातील जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीबिंदूच्या उच्चस्तरीय तपासणी करिता एक तुकडी पाठविण्यात आली.
याप्रसंगी रुग्णांना चादर, पाणी बॉटल, पिशवी व मिठाईचे वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे लाखो रुग्णांचे दृष्टीदाते आहे. घुग्घुस परिसरात अनेक वर्षापासुन उच्चस्तरीय तपासणी करिता जेष्ठ नागरिकांच्या अनेक तुकड्या सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहे तसेच अनेक वर्षांपासून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील गोर, गरीब, गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे, हे रुग्णसेवेचे पवित्र कार्य निरंतर पणे सुरु आहे. कोणत्याही गरजू रुग्णाला आरोग्यविषयक मदत लागल्यास घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

यावेळी भाजपा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, श्रीकांत सावे, सुभाष मशाखेत्री, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, शौर्य बोढे, सुनंदा लिहीतकर, लता आवारी, अजय लेंडे, उमेश दडमल, खुशबू मेश्राम व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment