Ads

त्या तिन्ही लाचखोर अधिकाऱ्यांची तुरंगात रवानगी

चंद्रपुर :-लाच लुचपत प्रतिबंधक पोलीस नागपूर ने 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मृद व जलसंधारण विभागातील लाचखोर अधिकारी कविजीत पाटील, श्रावण शेंडे अणि रोहीत गौतम यानां 3 मे ला अटक केली होती. या तिन्ही अधिकाऱ्यांनी एकूण 81 लाखांची लाच मागितली होती.तिघांच्याही न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी 9 मे ला संपली. त्यामुळे त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्याने पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. पण, न्यायालयाने या तिनही आरोपींची 22 मे पर्यंत जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. The three corrupt officials were sent to jail. मात्र, न्यायालयाने या तिघांचाही जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे कविजीत पाटील, श्रावण शेंडे आणि रोहीत गौतम यांच्या अडचणीत वाढ झाली असून सध्यातरी त्यांना तरूंगातच राहावे लागणार आहे.

कंत्राटदारांना बोलावले चौकशीला

मृद व जलसंधारण विभागातील तीन मोठ्या अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आता या विभागात कोट्यवधी रुपयांची कामे करीत असलेल्या चंद्रपूर आणि नागपूर येथील आठ कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 6 मे रोजी नोटीस पाठविल्याने कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.
सूत्राने दिलेल्या माहिती नुसार,अधिकाऱ्यांच्या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या चौकशीत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. चंद्रपूर आणि नागपूर येथील अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली.तर नागपूर,ब्रह्मपुरी व चंद्रपुर येथील कार्यालय सील करण्यात आले. त्यामध्ये काही आक्षेपार्ह व कागदपत्र कागदपत्र सापडल्याने त्या आधारावरच आता नागपूर आणि चंद्रपूर येथील आठ कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. इंद्रकुमार उके, शुभम शेख, राजेंद्र चौधरी, गमे यांच्यासह अन्य कंत्राटदारांना 6 मे रोजी सूचनापत्र पाठवून 8 मे ला चौकशीला हजर राहण्यास बजाविले होते. मात्र, काही कंत्राटदार चौकशीला गेले तर काहींनी पाठ फिरविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कंत्राटदारांची चौकशी सुरू केल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे चंद्रपूर आणि नागपूरपुरते मर्यादित नाही तर मंत्रालयापर्यंत कमिशनखोरी सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीदरम्यान, दिसून आल्याने एसीबीने हे प्रकरण अधिकच गांभीर्याने घेतले आहे.

ते 6 कंत्राटदार कोण...?
6 मे ला 8 कंत्राटदारांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या सूचना ए सी बी केल्यानंतर आता आणखी 6 कंत्राटदार हिट लिस्ट मध्ये आहेत.जुन्या 8 ची चौकशी झाल्या नंतर नागपूर,वर्धा,गडचिरोली व चंद्रपूर येथील आणखी 5 ते 6 कंत्राटदारांना व काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.अशी माहिती सूत्राने दिली.
*कंत्राटदार विजय घटोळेंनी केली होती तक्रार*
मृद व जलसंधारण विभागासाठी चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या तीन जिल्ह्यात विजय घाटोळे यांनीसर्व्हेक्षणाचे काम केले होते. केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी त्यांनी या कार्यालयाच्या वारंवार खेटा घालूनही बिल काढण्यात आले नाही. त्यासाठी घाटोळे यांना लाच मागण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या विजय घाटोळेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.आणि 3 अधिकारी तुरूंगवासी झाले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे जलसंधारण विभागात मंत्रालयापर्यंत जाळे पसरल्याची शक्यता आहे. पाटील,शेंडे व गौतम यांनी एकूण 80 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 50 लाख रुपये श्रावण शेंडे यांच्या स्वीकारले. जलसंधारण विभागात प्रचंड कमिशनखोरी सुरू आहे. ही कमिशनखोरी केवळ चंद्रपुरातच आहे, असे नाही तर राज्यात सर्वत्र आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जवळपास 200 कोटी पेक्षा अधिकची कामे काढण्यात आली.तर,राज्यात जवळपास अडीच हजार कोटींची कामे काढल्या गेली.ही कामे मिळविण्यासाठी व त्याचे नंतर बिल काढण्यासाठी कमिशन घेणे हे कायदेशीरच समजले जाते.हे विशेष.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment