Ads

गोंडवाना विद्यापीठाच्या निधीचा अपव्यय तात्काळ थांबवा :- गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना नितीन भटारकर यांचे निवेदन.

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे व्यवस्थापण परिषदेच्या सन्माननीय सदस्यांकरीता ऍपल या कंपनी चे Ipad विकत घेण्याकरीता गोंडवाना विद्यापीठाने प्रस्ताव काढलेला आहे. सदर वस्तू ही अंदाजित ५५०००/- रु प्रति नग बाजारात उपलब्ध आहे आणि व्यवस्थापन परिषदेच्या एकूण २० सदस्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे तब्बल ११ लक्ष रुपयांचा खर्च या खरेदीत होणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे मागील अंदाजपत्रका नुसार विद्यापीठावर आधीच कोटयावधी रुपयांचा आर्थिक बोझा असुन विद्यापीठाचे मागील अंदाजपत्रक हे तुटीचे आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठाची अशी अनेक महत्वाची कामे प्रलंबित आहेत ज्याला प्राधान्य मिळताना दिसत नाही.

अजूनही गोंडवाना विद्यापीठाने पदव्युत्तर विभागाच्या वर्गखोल्या आणि प्रयोगशळा बनवण्यासाठी कोणतीही तत्परता दाखवली नाही. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या सध्या उभ्या असलेल्या इमारतीच्या मागे घाई घाईने नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु या इमारतीत देखील अजूनपर्यंत विद्यापीठाद्वारे पदव्युत्तर विभागासाठी तात्पुरत्या वर्गखोल्या आणि प्रयोगशाळा यांची सोय देखील केलेली नाही.

अश्यास्थितीत केवळ ४ महिने उरलेला असताना ही IPaid खरेदी अनावश्यक आहे असे. या आधी देखील विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी ऍपल या कंपनीचे फोन खरेदी करण्यात आले असे निदर्शनास आलेले आहे.

परिक्षा व अकाउंटस ची सर्व कामे विंडोवस बेस्ड (Windows Based) असताना IPad चे असे कोनते नेमके काम आहे हे अनाकलनीय आहे. एका विशिष्ट कम्पनीचे हे उपकरण घेऊन काय साध्य होनार, हा एक संशोधनाचा प्रश्न असुन या खरेदीसाठीच्या रक्कमेची तरतूद कोणत्या लेखाशिर्षामध्ये करण्यात आलेली आहे हे सामान्य जनतेला व विद्यार्थ्याना कळेल काय..? असा प्रतिप्रश्न देखील कुलगुरूंना नितीन भटारकर यांनी केला.

करोना नंतर सर्वच शासकीय प्रांतांत निधीची चणचण असल्यामुळे विद्यार्थ्याच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असताना विद्यापीठ निधी संदर्भात विश्वस्तांनी असे निर्णय घेणे योग्य नाही. तसेच विद्यापीठाचा सतत वाढत असणारा वित्तीय तोटा हा मुद्दाही दुर्लक्षून चालणार नाही. व म्हणून प्रति महिना लाखो रुपये पगार असलेल्या किंवा कमविणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या सन्माननीय सदस्यांकरिता महिने, २ महिन्यातून फक्त १ दिवसाच्या मीटिंग करीता विद्यापीठाने खरेदी केलेली संपत्ती हस्तांतरित करणे संयुक्तिक नसुन बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्याकरिता आलेला निधी हा विद्यार्थी हिताकरिताच वापरला पाहिजे.

जर व्यवस्थापन समितीला विद्यापीठाकडून आलेला एक इमेल आणि एक पिडीएफ फाईल हाताळण्यासाठी आयपॅड देण्यात येणार असेल तर विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका सॉफ्ट कॉपी मध्ये बनवून इमेल ने पाठवण्याची विद्यापीठाची सूचना ज्या प्राध्यापकांना देण्यात येते त्यांना पण एक लॅपटॉप देण्यात येणार आहे का..? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना विचारला.

गोंडवाना विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा अपव्यय होतोय असे स्पष्ट दिसत असल्याने सदर खरेदी प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी आणि विद्यापीठ प्रशासनाने व व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थी हिताला महत्व यावे, ही मागणी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे सर यांचेकडे कडे केली.

सदर अवास्तव खरेदी प्रक्रिया थांबविणेबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत तथा राज्यमंत्री मा. प्राजक्तजी तनपुरे यांना देखील सविस्तर निवेदन पाठविण्यात आले.

आज दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने पुढे होनारी खरेदी प्रक्रिया न थांबवल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गोंडवाना विद्यापीठाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन भटारकर यांनी यावेळी दिला.

सदर निवेदन देताना नितीन भटारकर यांचेसह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कोमिल मडावी, सौरभ घोरपडे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment