Ads

आलेसुर येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

सिंदेवाही :-नवरगाव वनक्षेत्रातील आलेसूर ते गोठ्यात घुसून बिबट्याने सात शेळ्या ठार The leopard killed seven goatsकेल्याची घटना आज दि. 29 मई 2022 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
नियक्षेत्र नवरगाव-१ मधील राखीव वनालगत असलेल्या मौजा आलेसूर येथील गुलाब सोमा शेंडे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबटने शिरकाव करून ४ शेळ्या २ पाटा व 1 बोकड जागीच ठार केले असून असे एकूण 7 शेळ्या ठार केले.
सदर घटनेत मालकाचे जवळ पास 70 हजार रुपये चे नुकसान झालेले आहे.
सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच क्षेत्र सहाय्यक एस.वाय. बुल्ले, वनरक्षक निकेश सहारे , यांनी मौका पंचनामा करून शेळ्या पुरून देण्यात आल्या.
अशा प्रकारच्या सर्व घटनेस विद्युत विभाग जिम्मेदार असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसापासून परिसरातील ग्राम पंचायतच्या रोडचे पथदिव्यांची लाईट कनेक्शन विद्युत विभागाने कट केले असल्यामुळे गावागावात रस्त्यांवर रात्री अंधार पसरलेला असतो. त्यामुळे वन्यप्राणी बिनधास्तपणे गावात प्रवेश करून अशा प्रकारच्या घटनां घडतात. अंधाराचा फायदा घेऊन गोठ्यात घुसून बिबट्याने शेळ्या मारल्या, जंगल परिसरातील गाव असल्याने गावात रात्री विद्युत असणे आवश्यक आहे अन्यथा मनुष्य जीव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण असणार आहे. त्यामुळे विद्युत विभागाने व ग्रामपंचायतीने पथदिव्यांची लाईट पूर्ववत करावी जेणे करून मानव-वन्यजीव संघर्ष human-wildlife conflict टाळण्यास मदत होईल असे ही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment