चंद्रपुर :- यंग चांदा ब्रिगेड ही संस्था समाजसेवेच्या उदिष्टाने स्थापण करण्यात आली आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी संघटनेची सदर उदिष्ट पुर्ततेकडे वाटचाल सुरु आहे. गोर - गरिब, शोषीत, पीडीत, अन्यायग्रस्त अशांना मदत करुन न्याय देण्याचे काम संघटनेच्या वतीने सुरु आहे. छोटा नागपुर येथील यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेच्या माध्यमातुनही नवनियुक्त पदाधिका-र्यांनी समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
छोटा नागपूर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेच्या फलकाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, खुटाळा गावाचे माजी सरपंच प्रविण सिंह, जय मिश्रा, भाग्यवाण गणफुले, छोटा नागपूर शाखा अध्यक्ष विशाल रामटेके, उपाध्यक्ष अनिल कातकर, सचिव दिनेश रामटेके, यंग चांदा ब्रिगेडचे प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, गणेश पाचभाई आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय काम केल्या जात आहे. कोरोना काळात संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडने दिलेला मदतीचा हात चंद्रपूरकरांच्या नेहमी स्मरणात राहणार आहे. या काळात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून ठिक ठिकाणी हॅंन्डवाश सेंटर सुरु करण्यात आले होते. तर मास्क, सॅनिटायजरचेही वाटप सातत्याने यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. लाॅकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला अशात गरजु कुटुंबांना यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन जेवणाची व धान्य किटची व्यवस्था करुन देण्यात आली. या कठीण काळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद होते. त्यांच्या याच कार्यामुळे यंग चांदा ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन सत्कारही करण्यात आला. आजही यंग चांदा ब्रिगेडचा कार्यकर्ता समाजातील शेवटच्या गरजु पर्यंत पोहचून त्यांना मदत करण्याचे काम करत आहे. पात्र लाभार्त्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा यासाठीही यंग चांदा ब्रिगेड काम करत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने काम केल्या जात आहे. आज युवा वर्ग आणि महिला मोठ्या प्रमाणात यंग चांदा ब्रिगेडमध्ये सामील होत आहे. हीच निस्वार्थरित्या सुरु असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या कामाची खरी पावती असल्याचे ते यावेळी म्हणाले.
छोटा नागपुर येथील युवकही मोठ्या प्रमाणात यंग चांदा ब्रिगेडमध्ये सहभागी झाला आहे. मात्र ही संघटना पद भुषविण्यासाठी नाही तर सामाजिक काम करण्यासाठी आहे. याची नवनियुक्त पदाधिका-र्यांना नेहमी जाणिव असावी, या भागातील नागरिकांच्या समस्या, समाजातील व्यथा, वेदना या शाखेच्या माध्यमातुन माझ्या पर्यंत पोहचाव्यात असे आवाहणही यावेळी बोलतांना त्यांनी केले. या प्रसंगी लाल फित कापुन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते यंग चांदा ब्रिगेडच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment