Ads

लग्नाला दिला नकार ,युवतीवर युवकाचे चाकूने वार.

गडचांदूर :- युवकाने एका मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केल्यानंतर स्वतःच्या हातावर सुद्धा चाकूने वार करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना 23 मे रोजी दुपारच्या सुमारास गडचांदूर शहरा जवळील असलेल्या पर्यटन स्थळ माणिकगड किल्ल्यावर घडली.
सदर घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा असून दोघेही गडचांदूर येथील असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.सदर घटने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,गडचांदूर येथील 21 वर्षीय युवक आपल्या प्रेयसी मुलीला घेऊन माणिकगड किल्ल्यावर गेला.या दरम्यान सदर युवकाने मुलीकडे लग्नाची मागणी घातली.मात्र मुलीने याला नकार दिला.तेव्हा मुलाने रागाच्या भरात मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले आणि स्वतःच्या हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Refusal to marry, young man stabs young woman दरम्यान किल्ल्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर लगेच येथील वनमजूराला बोलावून यांना किल्ल्यावरून खाली आणले व नंतर संबंधित क्षेत्रातील जिवती पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही जवळच्या गडचांदूर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर पुठील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.सध्या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते.जिवती पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि जगताप करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment