Ads

रेल्वे आणि वेकोली च्या विरोधात जनआक्रोश

भद्रावति तालुका प्रतिनिधी:-माजरी-माजरीत रेल्वे आणि वेकोली च्या विरोधात जनआक्रोश पाहायला मिळाले 14 मे 2022 ला रेल्वे प्रशासन लोकांच्या घरे पडायला येणार या उद्देशाने संपूर्ण माजरी एकत्र झाली आणि नाही नाही मनता दीड हजार लोक आपापल्या घरून निघून रेल्वे रुळावर एकत्र होणे सूरू झाले लोकांचे आक्रोश बघून व्यापारी संगटना,माजरी संघर्ष , सर्व राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शनिवारी आंबेडकर वार्ड ते मुन्ना हॉटेल पर्यंत जमा होत गेले या ठीकानी उपस्थित नेत्यांनी या जन आक्रोश पाहून या संघर्ष ला माजरी एकता चे नाव देऊन माजरी संघर्ष समिती आणि व्यापारी संघटना च्या पुढाकाराने जनआक्रोश मोर्चाने माजरी परिसर दणाणून गेले. यावेळी रेल्वेच्या वेकोली विरुद्ध घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. हा जनआक्रोश मोर्चा रेल्वे लाइनजवळ मुन्ना हॉटेल येथून काढण्यात आले असून माजरीतील मुख्य मार्गावरुन आंबेडकर वार्ड, तेलुगु दफाई,सिद्धार्थ वार्ड येथून भ्रमण करत मुन्ना हॉटेल येथे परत पोहोचला.
मोर्चात संतप्तमहिला नागरीक युवकासह अबालवृद्ध हजारोच्या संख्येने सहभागी होऊन रेल्वे प्रशासन व वेकोलि प्रशासन यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान माजी जी.प.सदस्य प्रवीण सुर, संघर्ष समितीचे राजेश रेवते,व्यापारी संघटनेचे उल्हास रत्नपारखी, भारतीय मुस्लिम परिषदचे अशरफ खान माजरी सरपंच सौ छाया जंगम माजी सरपंच श्रीकृष्ण वनकर सामाजिक कार्यकर्ते रवि राय यांनी रेल्वे प्रशासना विरुद्ध हा लढा असून पीडित नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असे आपल्या भाषणात सांगितले.
या जनआंदोलनाला आता माजरीतील विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संगटनेनी पूर्ण ताकदीने समर्थन दिले आहे.सदर जनआंदोलन उग्र रूप धारण करतील अशी आशंका व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे रेल्वेच्या कारवाई दरम्यान आरपीएफचे जवान व नागरिक आमने सामने येण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर ने या सर्वांना मार्गदर्शन करताना म्हटले की रेल्वे प्रशासन हे जाणून माजरी चे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करत आहे कर माजरितील लोकांचे आक्रोश वाढले तर यात रेल्वे वेकोली आणि राज्य सरकार जवाबदार असनार असे म्हटले आहे आणि तसे निवेदन ही दिले आहे, माजरी संघर्ष समिती ने जिल्हाधिकारी ला माजरी पोलीस स्टेशन च्या माध्यमातून निवेदन देऊन एक ही घर तोडू नये म्हणून निवेदन दिले आहे
शिक्षण घेणारे व येणाऱ्या काळात नौकरीवर लागणारे युवकांनी आंदोलनात सहभागी होवू नये. आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
--विनीत घागे, ठाणेदार, माजरी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment