Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या रेती तस्करणावर पोलिसांची मोठी कारवाई

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
दिनांक ०७/०५/२०२२ रोजी प्राप्त गोपनिय माहितीवरून श्री. आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस कर्मचारी व पोलीस स्टेशन, वरोरा येथील पोउपनि/किशोर मितखार व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी यांचे संयुक्त विद्यमाने रात्रौ २१.०० वा सुमारास मौजा सोईट येथील वर्मा नदी पात्रातील रेती घाटात छापा घालुन रात्रीचे दरम्यान रेती या गौण खनिजावे अवैध उत्खनन करणारे ६ हायवा ट्रक र टिप्पर ट्रक आणि २ पोकलेन मशिन व उत्खनन कंपनी वाहनांमध्ये भरलेला रेतीसाठा असा एकूण २,६०,८०,०००/ रुपये दोन करोड साठ लाख ऐसी हजार रुपये वा मुद्देमाल जप्त केलेल्या असुन ट्रक चालक, मालक, पोकलॅग ऑपरेटर आणि रेती घटाची देखभाल करणारा दिवानी अशा एकुण १७ आरोपीविरुद्ध गुन्हा क. २७५/२०२२ कलम ३७९,३४. भा.दं. वि. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे सदर रेती घाट जरी रेती उपसा करणेकरीता मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर आदेशानेललाव झाला असता तरी कोणत्याही मशिन/यंत्राव्दारे रेती उत्खनन करू नये, असे स्पष्ट निर्देश असतांना व रात्रीचे वेळात गौण उत्न करण्यास मनाई असतांना सुध्दा यातील आरोपीनी रात्रीचे वेळात दोन पोकलॅनव्दारे रेतीचे अन करून ट्रकमध्ये भरतांना मिळुन आल्याने श्री. आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी कायदेशिर कार्यवाही केलेली आहे. सदर कार्यवाही करीता पोउपनि/किशोर मितरवार तसेच दिपक दुधे, दिलीप सुर, मनोहर आमने, मोहन निषाद, सुरज मेश्राम, दिनेश मेश्राम, दिपक मेश्राम व विठ्ठल काकडे अशा पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करीता अहवाल महसुल विभागाकडे पाठविण्यात आला आहे.कंपनी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

1 comments: