Ads

त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वनविभागाचे आदेश

चंद्रपूर / दुर्गापूर :-10 मे ला रात्री 9 वाजे दरम्यान दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला, मात्र मुलीच्या आईने बिबट्यावर काठीने प्रहार करीत आपल्या मुलीचा जीव वाचविला. Leopard attack मागील अनेक महिन्यापासून तो नरभक्षक बिबट्या दुर्गापुरातील लहान व मोठ्यांची शिकार करीत आहे. मात्र वनविभागाने अजूनही त्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. मध्यंतरी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते मात्र तो नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडलाच नव्हता.
त्यामुळे त्या नरभक्षकाचे हल्ले सतत सुरुच होते, 10 मे ला रात्री 9 वाजता आरक्षा पोप्पूलवार ही 3 वर्षीय चिमुकली खेळून झाल्यावर जेवायला बसली होती, त्याचवेळी अचानक बिबट्याने आरक्षावर हल्ला केला. मुलीवर झालेला हल्ला बघता आईने त्या बिबट्यावर काठीने वार करीत बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडविले. Mother's fight with
leopard दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.वेळेवर उपचार मिळाल्याने मुलीची प्रकृती आता बरी आहे.
वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे दुर्गापुरातील नागरिक चांगलेच संतापले, वनविभागाचे RFO राहुल कारेकर व त्यांची चमू रात्री दुर्गापुरात पोहचली होती मात्र त्यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. Chandrapur forest गावकऱ्यांनी RFO सहित वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले, जोपर्यंत त्या नरभक्षकाला ठार मारण्याचे आदेश वनविभाग देणार नाही तोपर्यंत आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाहीअशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. Order to kill

तब्बल 5 तासांच्या नाट्यक्रमानंतर वनविभागाच्या वतीने त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने जारी केले, त्यामुळे गावकऱ्यांनी RFO कारेकर सहित असलेल्या 10 कर्मचाऱ्यांची सुटका केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment