Ads

गोठयात शिरून बिबट्याने वासराला केले ठार.

सिंदेवाही :-मागील काही दिवसांपासून सिंदेवाही तालुक्यातील वन्यजीव मानवी जीवन मध्ये मोठ्या प्रमाणात संघर्षा सूर आहे. या संघर्षात अनेकांचे बळी गेले आहे.सर्वीकडे दहशतीचे वातावरण आहे.

वन सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत उपवनपरीक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या रत्नापुर बीट आहे. सदर रत्नापुर गावासभोवताल कोणताही जंगल परीसर नसुन सर्वत्र शेत शिवार परीसर आहे. तरीपण या परीसरातुन वार्ड क्र ५ असलेल्या शांताराम कारमेंगे रत्नापुर येथे पहाटेच्या सुमारास थेट गोठयात शिरून बिबट्याने गोरीवर हल्ला केला Leopard kills calf . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त असे की, नवरगांव शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या रत्नापुर येथे शांताराम कारमेंगे यांचे वार्ड नं ५ येथे गोठा आहे.

शांताराम कारमेंगे हे शेतकारी असून यांच्याकडे स्वमालकीच्या गायी-गोरी आहेत. ३/५/२०२२ एप्रिलच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे कारमेंगे यांनी आपल्या गुरांना झोपण्याआधी गोठयात बांधले व झोपायला निघुन गेले. पहाटे अंदाजे ३ ते ४ वाजेच्या सुमारास बिबट्या ने गोरीवर हल्लाThe leopard attacked calf केला. आणि त्यामधे बिबट्याने ठार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही . या आधी अनेकदा बिबट्याने थेट गावात शिरून कित्येकांच्या घरचे गायी, शेळया, बकराचा सुद्धा जीव घेतला आहे. घटनास्थळी वनक्षक जितेंद्र वैद्य रत्नापुर, यांनी दाखल होवुन पंचनामा केला. जंगल परीसर सोडुन गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र या घटनेने दिसून येते आहे. त्यामुळे मानव व जंगली प्राणी यांचा सघर्ष होवुन जिवित हाणी होवु शकते. तरी वनविभागाने बिबट्याचा योग्य बंदोबस्त Proper management of leopards should be Done by the forest department करुन गावाला भयमुक्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment