ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातील फक्त काहीच रेतीघाटांचे लिलाव झाले असुन ते रेती घाट देतांना लांबी,रुंदी,उंची,उपसा करण्याची वेळ,व जागा निश्चित या शर्ती अटीघालुनच संबंधीत ठेकेदारांना अनेक घाटांचे ठेके देण्यात आले असतांनाही दिलेली लिलावाची जागा सोडुन भलत्याच जागेवरील आठ ते दहा फुटांवर वाळु पोखरली असल्याचा प्रकार उजेडात येत असुन व तशा प्रसार माध्यमातून बातम्या प्रकाशीत झाले असतांनाही खाकी वर्दी चा मोठा आशीर्वाद असल्याने वाळु घाट मालकांकडून यांची "खांदशेकणी " होत असल्याची शंका परीसरातील जनतेच्या चर्चेवरुन दिसुन येत आहे
एका लोकप्रतीनीधीच्या सहभागाने चापलुशी लोक मालदार झाले हे मात्र खरे आहे तर ब्रम्हपुरी तालुक्यातील खडकाळा पिंपळगाव चिचगाव आवळगाव या सह ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्ये घाटावरून असाच प्रकार सुरु असुन रात्र- दिवस रेती Sand Mafia तस्करी होत असुन खाकीवर्दी यात चांगलेच हात धुत असल्याचेही बोलले जात असुन या प्रकाराने काही मोजक्या लोकांना सुगीचे दिवस प्राप्त झाले असुन मालामाल झाले आहेत
आता वाळु ठेकेदारांशी चापलुशी करुन रात्रभर टॅक्टरणे वाळुची तस्करी Overnight through tractor sand smuggling होत असल्याने शासणाच्या करोडो रुपये महसुलाची चोरी करुन अनेक रस्ते खराब होत नदी काठावरील शेती,अनेकांच्या विहीरी नदी पात्रात गेल्याने अनेकांवर भुमीहीन होऊन उपाशी मरणाची पाळी आली असुन ग्रामीण लोकांची झोप मोड होतं मोठ्या राजकारणाच्या दबावात होत असल्याने या गंभीर प्रकारावर केंन्द्रीय पर्यावरण समीतीने चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी ब्रम्हपुरीतील सुज्ञ नागरीकाकडुन होत आहे. .............सुभाष माहोरे
0 comments:
Post a Comment