Ads

रोजगारासाठी उद्योग महत्वाचे मात्र नागरिकांच्या जीवनापेक्षा नाही : राजूरेड्डी

घुग्घूस :- शहर हा प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त झाला आहे
येथील वायू पूर्णतः विषारी झाली असून मानवा सह पशू - पक्षी यांचे जीवन ही धोक्यात आलेले आहे.

एकीकडे शहर प्रदूषणाने त्रस्त असताना लॉयड्स मेटल्स कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाची दिनांक 06 मे 2022 रोजी कंपनी परिसरात जनसुनावणी घेण्यात आली.
यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका घेत शहर अध्यक्ष राजूरेडडी यांनी
येवू घातलेल्या कंपनीत स्थानिक युवक व युवतीं सह विधवा परित्यक्ता महिलांची सरळ भर्ती घेवून रोजगार उपलब्ध करून द्यावे.प्रदूषण नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी करण्यात यावी
सामाजिक उत्तरदयित्व निधीतून शहराचा विकास करण्यात यावा अशी मागणी केली.

स्थानिक युवकांना रोजगार व शहरातील प्रदूषण नियंत्रण हे आपल्या साठी सर्वातपरी आहे.
आमचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडडेटीवार व खासदार बाळू धानोरकर यांनी सात किलो मिटर आतील स्थानिक बेरोजगारांना रोजगार व प्रदूषण नियंत्रनाचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचना दिल्या आहेत.
जर उद्योगाने नागरिकांच्या जीवन रक्षणाला प्राधान्य नाही दिल्यास काँग्रेस पक्ष ही कंपनी चालू देणार नाही असा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment