Ads

घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीचे लॉयड्स मेटल कंपनी विरोधात साखळी व आमरण उपोषण

घुग्घुस :- काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरीता गुरुवार 5 मे ला सायंकाळी 5 वाजता पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी व आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.घुग्घुस शहर काँग्रेस कमेटीचे लॉयड्स मेटल कंपनी विरोधात साखळी व आमरण उपोषण
चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हा सदस्य गणेश उईके व काँग्रेसचे महासचिव पवन नागपुरे यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.Ghughhus City Congress Committee's chain and death hunger strike against Lloyds Metal Company

लॉयड्स मेटलच्या पांदन रस्त्याचे अतिक्रमण हटविणे, पीएचसी समोरून ट्रकांची वाहतूक बंद करावी व पार्किंग हटवा, प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या आत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना नौकरी देणे, कंपनीच्या 760 करोडच्या नवीन बांधकामाची परवानगी नसतांना काम सुरु करण्यात आले त्या बांधकामचे नाहरकत परवानगी देणे, कंपनीने आरोग्य सेवा केंद्र सुरु करावे व 80% सेवा मोफत देण्यात यावे, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा, कंपनीचे प्रदूषण नियंत्रित करावे, धूळ अंडरग्राउंड करावे.

अश्या विविध मागण्यासाठी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात लॉयड्स मेटल कंपनीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी व आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
आज पहिल्याच दिवशी साखळी व आमरण उपोषणाला घुग्घुस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले समर्थन दिले आहे.

यावेळी माजी जिप सदस्य जयंता जोगी, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी, काँग्रेस नेते शेखर तंगल्लापेली, विक्रम गोगला, किरण पुरेल्ली, कल्याण सोदारी, शहजाद शेख, सिनू गुडला, गिरीश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपूर विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकूला, ओबीसी कार्याध्यक्ष गोविंद झाडे, वीजेएनटी कार्याध्यक्ष राजू शेट्टी, वीजेएनटी शहराध्यक्ष योहन इरगुराला, विधानसभा सचिव रवी दिकोंडा, शरद अवताडे, दिवाकर वडलकोंडावार उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment