Ads

माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा वाढदिवस निमित्य भव्य रक्तदान व पुस्तक प्रकाशन सोहळा सम्पंन्न.

वरोरा :- वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा ४९वा वाढदिवस आज मंगळवार २४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराने व पुस्तक प्रकाशनाने आलिशान सेलिब्रेशन हॉल येथे साजरा झाला. *नगराध्यक्ष म्हणून मागील पाच वर्षांत शहरात केलेल्या कोट्यावधीचे ठडक विकास कामे,त्यांचा अनुभवाचा लेखाजोखा म्हणून " माझा वरोरा " नामक एका स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

येथील आलिशान सभागृहात झालेल्या या समारंभात लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते व प्रसिद्ध साहित्यिक ना. गो.थुटे,डाॅ.हेमंत खापने,श्रीकृष्णा घड्याळपाटील,रोटरीचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांच्या उपस्थितीत आज या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. या प्रसंगी प्रा.श्रीपाद पाटिल यानी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की वरोरा शहरात सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन संपूर्ण शहराचा विकास करणारे नगराध्यक्ष,वरोरा शहराचा ईतीहासात कोट्यावधिची विकास कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलविनारे नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण होईल,प्रमाणिक- मुदभाषी,सर्व धर्माचे आदर करणारे सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी ओळखले जाणार,आपण केलेले कार्य या शाहरची जनता कधिच विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. बाबासाहेब भागडे यांनी याप्रसंगी प्रकाशन सोहळ्याचे संचालन केले.
रक्तदान शिबिरामध्ये १५१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले हे विशेष. रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे यांचे सहकार्य मिळाले.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटनाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व सर्व स्तरातील हजारो नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येऊन अहेतेशाम अली यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment