Ads

उड्डाणपूल निर्माण करणाऱ्या कंपनीवर काँग्रेसची धडक

घुग्घुस:- शहरातील सर्वात मोठी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडणुकीसाठी राजीव रतन चौकात असलेल्या रेल्वे गेट वर आर.के. गोधानी कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे कार्य सुरू करण्यात आले असून चंद्रपूर - यवतमाळ - पुणे हा राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने पुलाचे कार्य सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक होते.
मात्र पुल निर्माण करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजी व ढिसाळ व्यवस्थापनाने हा मार्ग अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.
यामुळे संतप्त काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी सहकार्या सह कंपनीचे कार्यालय गाठून कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या मार्गावरील अपघात ग्रस्त नागरिकांना तात्ळीने रुग्णालयात नेण्यासाठी चोवीस तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करा वाहतूक नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकाची संख्या वाढवा

खोद कामातून निघणारी वेस्ट मटेरियल उदा. माती सिमेंट क्रोंकिट व इतर साहित्यांचा वापर घुग्गुस महाताररदेवी रोडवरील खड्डे बुजिण्यासाठी करावा तसेच उर्वरित वेस्ट मटेरियल शहरातील सामाजिक अथवा धार्मिक परिसरातील दुरुस्ती करिता करावा तसेच रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी स्वचछताकर्मीची नियुक्ती करावी.
रस्त्यावर वॉटर टँकरने पाण्याचा छीळकाव करावा व या मागण्या आठ दिवसात सोडवा अन्यथा कंपनीचा काम बंदचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, नुरुल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी, रोहित डाकुर, रफिक शेख, बालकिशन कुलसंगे,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे, सुनील पाटील,कपिल गोगला,प्रदीप आसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment