Ads

काँग्रेसने केला भांडाफोड

घुग्घुस :- स्नेहा फूडस या ऑईल रिफायनरी कंपनीने परत एकदा कंपनीत झालेल्या अपघाताला लपविण्याचा प्रयत्न केला.
मात्र काँग्रेसने या प्रकरणाचा भांडा फोड केला आहे
08 मे रोजी सकाळी साडे दहा वाजता स्नेहा कंपनी मध्ये सुरक्षा साधनां शिवाय AP 16,- TQ 1555 क्रमांकाच्या ट्रक मध्ये सोयाबीन पावडरचे जड असलेले मोठे - मोठे बॅगा भरत असताना उंची वरून खाली पडून गंभीर रित्या जखमी झालेल्या नंदी पेटी बाबू या चाळीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मात्र सदर घटनेची माहिती कंपनी तर्फे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला
कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी तर कहरच केला काल दुपारी मृत झालेल्या त्या कामगारांचा नागपुरात उपचार सुरू असल्याची खोटी माहितीच दिली.


मात्र काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर हे दिनांक 09 मे रोजी कार्यकर्त्यांसह कंपनीत गेले तेथून ज्या वाहनात सोयाबीन पावडर भरताना अपघात घडला त्यांच्या मालकाशी संपर्क साधून कामगारांच्या मृत्यूचा भांडाफोड केला.

गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी स्नेहा कंपनीत विद्युत शॉक लागून एका परप्रांतीय कामगारांचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला असता सदर मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला होता.

या कंपनीत सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून 80% परप्रांतीय कामगार कामावर घेतले असून त्यांना कुटल्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता त्यांना बंधवा मजुरा सारखी वागणूक दिल्या जात आहे.

आज घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे कंपनीच्या मुख्य गेटवर जोरदार निर्दर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.

या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी काँग्रेसने केली
कंपनी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी घुग्गुस पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले याप्रसंगी रोशन दंतलवार, मोसिम् शेख, रफिक शेख,देव भंडारी,रोहित डाकुर, आरिफ शेख,कपिल गोगला, साहिल सैय्यद, सुनील पाटील,अंकुश सपाटे, बालकिशन कूळसंगे व पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment