Ads

दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या तो नरभक्षक बिबट जेरबंद

चंद्रपूर / दुर्गापूर :- मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या अनेकांचे बळी घेणारा त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले. Leopard trapped
दिनांक 13/05/2022 रोजी पहाटे 3:56 वाजता चंद्रपुर वनपरिक्षेत्रातील दुर्गापुर नियाक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या वार्ड न. 1 वार्ड न 3 तसेच वेकोली परिसर, उर्जानगर, कोंडी, नेरी परिसरात धुमाकुळ घालून मानवी तास धोकादायक ठरलेला विचट (मादी) ला गुलाईज करून जेरबंद करण्यात वनविभाग यशस्वी झाले.leopard tranquilize successful..

घटनेची सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे मागील 3 महिन्यापासून दुर्गापुर ग्रामपंचायत व उर्जानगर ग्रामपंचायत तसेच बेकोली परिसरात बिबट घुमाकुळ घालून मानवावर हल्ले करीत होता. त्यामुळे तेथील जनतेचा वनविभागावर प्रचंड रोष होता व बिबट्याला ठार करावे अशी मागणी होती. यावर आळा घालण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. वरिष्ठ कार्यालयाकडून बिबट्याला जेरबंद किंवा ठार मारण्याची 10/05/2022 ला परवानगी देण्यात आली. त्याकरीता जेरबंद करण्यासाठी 4 पिजरे, कॅमेरा ट्रॅप तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपुर यांचे नेतृत्वात चंद्रपूर परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, संरक्षण पथक चंद्रपूर, आर. आर. पुनिट टिम चंद्रपूर, पशुवैद्यकीय अधिकारी, ता.अ.व्या.प्र. चंद्रपूर, शुटर RRT, स्थानिक PRT एकूण 35 सदस्य तर्फे गस्त करीत होते. विवट (मादी) पिंजऱ्याजवळ येत होती परंतु पिंजऱ्यात शिरत नव्हती. से मानवावर हल्ले करणारा विवट हा मांदी आहे हे घटनास्थळाजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रैप मध्ये आलेल्या फोटोवरून निष्पन झाले व वनविभागाचे चमुने त्या बिबट चा शोध सुरु केला. दिनांक 12/05/2022 ला बिबट्याचा 3 चे सायंकाळी चम बिबटया चा वावर असलेल्या परिसरात मागोवा घेत असताना बाई न 3 कडे विचट 7:30 दरम्यान दिसल्याबाबत माहीती मिळाली. लगेच वनविभागाचे चमुने बिबटचा शोध सुरु केला असता, विट वार्ड नं 3 कडुन छट पूजा ग्राउंड मार्गे सिनाळा फाट्या जवळील झुडपात लपुन बसलेला आढळून आला. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी शुटर लक्ष ठेवून होते. त्याला ट्रांगुलाईज अथवा ठार करण्यासाठी बेट बांधण्यात आला व त्यावर पाळत ठेवण्यात आली. दिनांक 13/05/2022 ला अंदाजे पहाटे 3:45 वाजता बिबट्याने बेटची शिकार केली त्याच वेळेस वनविभागाचे शूटर यांनी त्याला इंगुलाईज गनद्वारे ट्रैगुलाईज केले.

सदर बिबटयाला ट्रॉझीट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे सुरक्षीत ठेवण्यात आले. सदर मोहीम  प्रकाश लोणकर, मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर  प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर याचे मार्गदर्शनात  राहुल कारेकार वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपुर, डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी  मराठे शुटर श्री. एम. पी. गावाडे क्षेत्र सहाय्यक दुर्गापूर  आर. एम. पाथर्डे क्षेत्र सहाय्यक चंद्रपूर  एस. जी. गोजे वनपाल  आर. आर. वासेकर वनपाल,  डी. एम. दुपार वनपाल, आर. एन. बीडरे वनपाल , डी. बी. दहेगावकर वनरक्षक , व्ही. पी. भिमनवार वनरक्षक ,बी.एम. गोधने वनरक्षक, एस. पी. पारवे वनरक्षक श्री. ए. एस. पठाण वनरक्षक, बी. एम. वनकर वनरक्षक, आर. जी. बैनलवार वनरक्षक , डी. एल. उमरे वनरक्षक श्री. एस. एस. गेडाम वनरक्षक , के. जी. डांगे वनमजूर, एस. एस. पोईनकर वनमजूर, एस. एस. रायपुरे वनमजूर,  एम. पी. चावरे,  के.एम. बहादे, सचिन मोगरे, श्मोहुर्ले, तिखट,  ननावरे, कोपरे,  दांडेकर स्थानीक • PRT टिम यांनी यशस्वी केली. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने यापुढेही शोधमोहीम सुरु राहील.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment