Ads

धनराज कोवे यांचा वाढदिवस म्हणजे सेवाभावाचा उत्तम कार्यक्रम- डॉ. गुलवाडे

चंद्रपुर :- सामाजिक कार्यकर्ते धनराज कोवे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित मोफत रोगनिदान शिबिर, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच ई-श्रम कार्ड वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन क्रिष्णनगर पटांगण, समाजमंदिर येथे करण्यात आले. शेकडो नागरीकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला संबोधीत करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर, डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले की, धनराज कोवे यांचा वाढदिवसीय कार्यक्रम हा सेवाभावाचा उत्तम उदाहरण आहे.
तसेच जिल्हा महामंत्री ब्रिजभुषन पाझारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले धनराज उत्तम समाज सेवक आहेत हे त्यांच्या नेहमी करीत असलेल्या उपक्रमातून सिद्ध होते. वयाच्या १४ वर्षापासून समाज सेवा करणा-या धनराजला माझा आशिर्वाद व सदैव सहकार्य राहील असे आपल्या भाषणातून जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी आशीर्वादीरुपी सुभेच्छा दिल्या. तेव्हा धनराज कोवे यांनी म्हटले की, मला लोकनेते विकास पुरूष मा. आमदार सुधिरभाऊ
मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याने समाज सेवा करायचे बळ मिळाले आहे. उपस्थित सर्व
मान्यवरांचा अनमोल सहवास मिळाल्याचा खुप आनंद वाटत आहे. त्यामुळे पुढे सतत समाजाची सेवा करीत
राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, माजी नगरसेविका सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. वंदनाताई जांभुळकर, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी बंगाली समाज आघाडी,जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक भट्टाचार्य,वार्ड अध्यक्ष प्रलय सरकार, चंदन पाल,पप्पु बोपचे,मनोज पोतराजे, राकेश बोमनवार,निरंजने, आकाश मस्के,प्रविण उरकुडे,शिवम सिंग, बंडू गौरकार,गंगाधरभाऊ कुंटावार,सौ. निलीमा आत्राम, सौ. रेखा मडावी सविता प्रलय सरकार, राखी धनराज कोवे कविता बारई, निलीमा चांदेकर, शिवम सिंग, कवडू चौधरी, दादु पटले, संदीप चौधरी, गोपाल दत्ता, दिनेश पाल, संजहार सरकार, बाबुल गयाली, दिलीप गोलदार सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रलय सरकार यांनी अथक परीश्रम घेतले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment