Ads

बेलपातळी येथील विनापरवानगी मुरूम उत्खनात सत्ताधाऱ्याचा लेक

ब्रम्हपुरी :-तालुक्यात अवैध गौणखनिज चोरीचे वाढते प्रमाण, सत्ताधारी - विरोधक जोपासात असलेले एकमेकांचे हितसंबंध व महसूल प्रशासनाची बघ्याची भूमिका बघता वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरीचे नेते, कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत सायगाटा परिसरातून विनापरवानगी सुरु असलेल्या मुरूम उत्खनना बाबत, मुरूम माफिया, साजातील तलाठी व ज्यांचे कडे मुरूम टाकल्या जात आहे अशा सर्व दोषींवर कारवाई करीता उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना तक्रार निवेदन देतं कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र आपसी आथिर्क संबंध जोपासत या खनिज माफियावर कारवाई व्हावी अशी सामन्याची अपेक्षा असतानाही या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
सायगाटा मधील मुरूम उत्खनन पाठोपाठ बोंडेगाव तेथे हजारो ब्रासचा मुरूम उत्खनन होऊन यातील सूत्रधारी पुढाऱ्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.हे कमी झाले की काय यापाठोपाठ बेलपातळी येथे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका गटातील आठ दहा फूट खोल पर्यंत उपसा झालेला असून सुद्धा अद्याप पर्यंत जेसीबीच्या साह्याने उपसा सुरूच आहे.तर या अवैध उत्खनात ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस पार्टीच्या एका नेत्याचा सुपुत्र अवैध उत्खनात गुंतला असुन त्या सुपुत्राच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार चालत असल्याची लोक चर्चा सुरू आहे.
बेलपातळी येथील स्थानिक गावातील मुख्य डांबरीकरण रोडलगत शेतातील मुरूम गेली अनेक महिन्या पासून जेसीबीच्या साह्याने सूर्योदय होण्याच्या अगोदर पासुन ते सूर्यास्त झाल्यानंतर देखिल ट्रॅक्टर ने वाहतूक सूरू असून या अवैध मुरूम उत्खनन माफियावर,ज्या तलाठी साजात हा अवैध मुरूम उत्खनन सुरू आहे त्या साजातील तलाठी यांच्यावर काहीही कार्यवाही होतं नाही ही बाब निंदनीय असून कार्यवाहीस पात्र असून या साजातील तलाठी व अवैध मुरूम उत्खनन करून तस्करी करणाऱ्यावर तसेच हा मुरूम ज्यांच्या कडे टाकण्यात येत आहे त्यांच्यावर सुद्धा तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment