Ads

कलकाम मधील गुंतवणूकदारांच्या गुन्हेगाराला अटक करा - गुंतवणूकदार आक्रमक

चंद्रपूर :- 2013 पासून कलकाम रिअल इस्टेट कंपनीची सुरुवात होत अनेकांना दाम दुपट्टीचे आमिष देत सदर कंपनीने कोट्यवधी रुपये लाटले.
मात्र जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली त्यावेळी कंपनीने हात वर करीत सर्व कार्यालय बंद पाडले.
चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील नागरिकांकडून कंपनीने तब्बल 100 कोटी रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली, मात्र आता कंपनीने फसवणूक केल्यावर एजंट व गुंतवणूक दारांनी पैसे परत मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. Kalkam real infrastructure limited
चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज चौक परिसरात कलकाम कंपनीने कार्यालय सुरू केले होते, सदर कार्यालय प्रमुख विदर्भ प्रभारी विजय येरगुडे व विदेश रामटेके यांच्यावर कंपनीने जबाबदारी दिली, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपनीने एजंट नेमायला सुरुवात केली.
कलकाम कम्पनी विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास काही वर्षात गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट होणार असे आमिष दाखविण्यात आले. Investors
नागरिकांनी कलकाम कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली, मात्र मॅच्युरिटी ची जेव्हा वेळ आली त्यावेळी कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ केली.
एजंट व गुंतवणूकदारांनी पैसे मिळावे यासाठी कंपनीचे सर्व्हेसर्वा विष्णू दळवी, विजय सुपेकर, सुनील वांद्रे, मोहम्मद ईदरीस यांना भेटण्यासाठी मुंबई गाठली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
शेवट त्यांनी मनसे चे अविनाश जाधव यांची भेट घेतली त्यांना संपूर्ण आपबिती सांगितली, बाळा नांदगावकर यांनी सदर प्रकरणाची वाच्यता फोडण्यासाठी वरोरा विधानसभा प्रमुख राजू कुकडे यांचेकडे जबाबदारी दिली.

गुंतवणूकदार म्हणतात

रामटेके व येरगुडे मागील 3 वर्षांपासून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, आम्ही आवाज उंचावला तर कंपनीतर्फे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर आम्हाला दम देतात, मागची पत्रकार परिषद झाल्यावर आमच्या घरी काही माणसे येत तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकत होते, आम्ही कधीही गुप्ता व ठाकुर यांना आमचे पैसे परत मिळावे यासाठी कधीही मदत मागितली नाही, ते कंपनीची मदत करण्यासाठी आमच्या विरोधात उभे असतात.

कलकाम कंपनीच्या विरोधात जिल्हा प्रशासनाला तक्रार देण्यात आली असून लवकर सर्व संबंधितांवर MPID ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा येणाऱ्या 20 मे नंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पत्रकार परिषदेत यावेळी चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, घुघुस व ब्रह्मपुरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील गुंतवणूक दार व मनसेचे राजू कुकडे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment