Ads

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर महानगरपालिका हद्दवाढीबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक

चंद्रपुर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच हद्दवाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. सदर मागणीची दखल घेत ना. एकनाथ शिंदे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक घेत मनपा हद्दवाढीची कार्यवाही शिघ्रगतीने करण्याचे निर्देश दिले आहे. या बैठकीला चंद्रपूरहुन आमदार किशोर जोरगेवार, मुबंईहुन नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भुषण गगरानी आणि मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती
चंद्रपूर महानगरपालिका स्थापना २०१० रोजी झाली. या क्षेत्रामध्ये फक्त चंद्रपूर शहर समाविष्ठ करण्यात आले. परंतु चंद्रपूर शहरालगत असलेले ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाली, दाताळा, देवाडा, म्हाडा कॉलनी, एम.आय.डी.सी ते आरवट हे भाग औद्योगीक दृष्ट्या संपन्न असून यातील बहुतांश कामगार व कर्मचारी हे चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे.
परंतु हा भाग चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट नसल्यामुळे या भागात अपेक्षित अशी विकास कामे झालेली नाही. चंद्रपूर शहरालगतच्या ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाली, दाताळा, देवाडा, म्हाडा कॉलनी, एम.आय.डी.सी, आरवट या ग्रामपंचायत व ईतर ग्रामपंचायती चंद्रपूर शहर महानगरपालिके मध्ये समाविष्ठ करून घेतल्यास या भागाचा सर्वसमावेशक विकास करता येईल त्यामूळे मनापाची हद्दवाढ करुन सदर भाग चंद्रपूर महानगरपालिकेत सामावून घेण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. याचा पाठपूरावा त्यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. अखेर या पाठपूराव्याची ना. एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असुन सदर विषयासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापूढे मांडला. या बैठकीत सदर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी हद्दवाढीचा नविन प्रस्ताव तयार करुन पाठविणार असल्याचे मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी सांगितले. त्यानंतर तसा प्रस्ताव लवकर पाठवून मनपा हद्दवाढीची कार्यवाही शिघ्रगतीने करण्याचे निर्देश यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यावेळी बाबुपेठ येथील उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment