Ads

50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना 3 बड्या अधिकाऱ्यांना रंगेहात अटक.

चंद्रपूर :- कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलाकरीता व उर्वरित रक्कम वितरित करण्याकरिता मृद जलसंधारण विभाग नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्याकडे मृद व जलसंधारण कार्यालय जि. नागपूर व जि. चंद्रपूर येथे कोल्हापूर बंधारा सर्वेक्षणाचे काम होते, काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण विभागात बिले सादर केल्या गेले, पण बिलाची रक्कम काढून देण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वर्ग 1 जिल्हा
नागपूर 32 वर्षीय कविजित पाटील, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा
जलसंधारण अधिकारी वर्ग-१ चे 46 वर्षीय श्रावण शेंडे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर व विभागीय लेखाधिकारी जलसंधारण विभाग चंद्रपूर येथील 35 वर्षीय रोहित गौतम यांनी तक्रारदाराला 81 लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 50 लाख रुपये देण्याचे ठरले, मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचेशी सम्पर्क साधत तक्रार दिली.

पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सदर प्रकरणाची पडताळणी करीत सापळा रचला असता 50 लाख रुपये स्वीकारताना 46 वर्षीय श्रावण शेंडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी चंद्रपूर यांना 3 मे ला रंगेहात अटक केली.

सदर प्रकरणाची कारवाई सुरू आहे. सदर सापळा कारवाई लाचलुचपत विभाग नागपूरच्या पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सचिन मत्ते, सारंग मिराशी, प्रवीण लाकडे, जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी संतोष पंधरे, विकास सायरे, पो. ना. सारंग बालपांडे, सुशील यादव, म. ना. पो. शि. बबिता कोकर्डे, गिता चौधरी, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, पो. शि. हरीश गांजरे, चा. पो. ना. अमोल भक्ते, सर्व ला.प्र.वि. नागपूर व ना.पो. शि. रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, नरेश नन्नवरे, पो. शि. अमोल सिडाम, म. पो. शि. पुष्पा काचोरे, चा. पो. शि. सतीश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment